अचलपुरात दुचाकी आडवी लावून लुटणारे जेरबंद

अचलपूर(प्रतिनिधी) – अचलपूर शहरातील शनी मंदिराजवळ भरदुपारी दुचाकी आडवी लावून एकजणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खिशातील पैसे लुटणाऱ्या तिघाजणांना अचलपूर पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पवन किशोरीलाल शेटी (४२, रा. चावलमंडी, अचलपूर) हे ५ नोव्हेंबरला चावलमंडी येथून शनी मंदिराकडे जात असताना तीन अनोळखी तरुणांनी त्यांच्या पुढयात दुचाकी लावून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता खिशातून ७५ हजारांची रक्कम नेली.अचलपूर पोलिसांनी तक्रार प्राप्त होताच आरोपींचा शोध सुरू केला. या गुन्ह्यात संकेत अमोल मिसाळकर (१८, रा. रविनगर, परतवाडा) व त्याचे दोन अल्पवयीन साथीदार सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी मुख्य आरोपी संकेत मिसाळकर याला १७ नोव्हेंबर रोजी अटक केली तसेच लुटण्यात आलेली रक्कम जप्त केली. घटनेत वापरलेल्या दुचाकीचा शोध घेतला जात आहे.पोलिस अंमलदार पुरुषोत्तम बावणेर, श्रीकांत वाघ, प्यारेलाल जामूनकर, नितीन कळमटे यांनी ही कामगिरी पार पाडली. पुढील तपास अचलपूरचे प्रभारी ठाणेदार संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक अतिक अहमद खान करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top