परतवाडा शहरातून दोन वेगवेगळ्या दुचाकी लंपास करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अमरावती जिल्ह्यातील मोठी व्यावसायिक नगरी म्हणून प्रसिद्ध असलेली परतवाडा शहरात दिवाळी सणाच्या निमित्ताने मुख्य बाजारातील गर्दीचा फायदा घेत वेगवेगळ्या दोन दुचाकी लंपास करणाऱ्या त्या चोरट्याला परतवाडा पोलिसांनी जयस्तंभ चौक येथील चाबी बनविणाऱ्या कारागिरांच्या समय सूचकतेमुळे धारणी तालुक्यातील सोसाखेडा येथील आरोपी दुर्गेश शिवलाल सावलकर याला दोन दुचाकी सह अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार ,दिवाळी सनानिमित्त गर्दिचा फायदा घेवून परतवाडा शहरातील मालविय मोबाईल शॉपी व श्वेता मोबाईल शॉपी या दोन ठिकाणावरून वेगवेगळ्या कंपनीच्या दोन मोटर सायकल एकाच दिवशी चोरुन नेल्याबाबत पोलीस स्टेशनला तक्रारी प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले होते. या घटनेतील आरोपी व मोटर सायकलचा शोध घेण्याचे परतवाडा पोलीसांसमोर आवाहन होते. परतवाडा पोलीस स्टेशन चे ठाणेदार संदिप चव्हाण यांनी त्यांचे डीबी पथकास आरोपीचा शोध घेण्याचे तसेच गुन्हे उघडकीस आणन्याबाबत सुचना दिल्या. या नुसार डीबी पथकाने चोरी गेलेल्या दुचाकी संबधाने गोपनिय व तांत्रीक तपास केला. तसेच जयस्तंभ चौक येथे चाबी बनवून देणारा शेख सादिक शेख हसन रा, अचलपुर यास गुन्हयासंबधाने विचारपुस करण्यात आली.त्याने एक व्यक्ती दिनांक १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी मोटर सायकल क्रमांक एम एच २७ डि के ६०६४ होंडा शाईन कंपनीचे गाडीची चाबी बनविण्याकरीता आला होता. त्याचे बाबत संशय आल्याने त्याने सदर व्यक्तीचे आधार कार्ड व फोटो काढला. सदर आधारकार्ड व आरोपीचा फोटो वरुन पोलीसांनी सदर व्यक्तीचा शोध घेवून त्यास दिनांक १८ नोव्हेंबर रोजी अटक केली . त्यांचा कडून अप क्र.१८१/२०२३ मधील हिरो होंडा स्प्लेंडर क्रमांक एम एच २७ ए एच ५७४९ किमंत अंदाजे २५००० रुपये आणि १८२/२०२३ मधील मोटर सायकल होंडा शाईन क्रमांक एम एच २७ डिके ६०६४ किंमत अंदाजे ६०००० रुपये असा एकूण ८५००० रूपये किमतीचे असे दोन दुचाकी आरोपी धारणी तालुक्यातील सोसाखेडा येथील आरोपी दुर्गेश शिवलाल सावलकर यांच्या कडून ताब्यात घेण्यात आल्या आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, उपविभागीय अधिकारी अचलपुर अतुलकुमार नवगीरे, यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार संदिप चव्हाण, पो. उपनि विठ्ठल वाणी, सुधिर राउत, उमेश सावरकर, मनिष काटोलकर,विवेक ठाकरे, जितेश बाबील ,घनशाम किरोले यांनी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top