नागपूर येथील मत्स्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची बोट उलटली

बोरधरण येथील घटना

सेलु /अभय बेदमोहता
बोरधरण येथे शनिवारी नागपूर येथील मत्स्योद्योग विभागाचे ५ कर्मचारी हे बोर धरण येथे केज चे इन्स्पेक्शन करण्यासाठी आले होते.परंतू प्लेटफार्मकडे परत येत असताना या कर्मचाऱ्यांची बोट पलटी झाली. यातील चार कर्मचारी सुखरूप बचावले परंतू एका कर्मचाऱ्यांचा शोध लागला नाही. रविवारी सकाळपासून शोध कार्य सुरू केले परंतु दुपारपर्यंत कर्मचारी आढळून आले नाही. त्या कर्मचाऱ्यांचे नाव युवराज फिरके,नागपूर असे आहे.
सदर नागपुर येथील मत्स्य विभागाची चमू शनिवार रोजी इन्स्पेक्शन साठी बोरधरण येथे आले होते. इन्सपेक्शन करून परत काठावर येण्यासाठी रात्रीचे जवळपास ९ वाजताच्या सुमारास बोटने प्लॅटफॉर्मवर येत असताना बोठ पलटली असे सांगितले जात आहे. यातून सुनील ठाकरे, कठाणे , गेडे व महेंद्रसिंग हे प्लेटफार्मच्या दोराच्या सहाय्याने धरणाच्या.पाण्यातून वर आल्याने बचावले.परंतू युवराज. फिरके हे खोल पाण्यात गेल्याने पाण्या बाहेर येऊ शकले नाही. त्यांचा रात्री उशिरापर्यंत शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतू रात्र झाल्याने शोध लागू शकला नाही.
.सदर घटनेची माहिती बोरी कोकाटे येथील पोलीस पाटील यांनी सेलु पोलिसांना दिली. रविवारचे सकाळ पासून नागपूर येथील दिलीप यादव यांची चमूने आपले जाळे पसरवीत बेपत्ता असलेल्या मत्स्य विभागाचे अधिकारी फिरके यांचा पाण्यात कसोशीने शोध घेणे सुरु असून बातमी लिहे पर्यंत त्यांचे मृतदेह हाती लागले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top