मिलन मिठाई चे संचालक अशोक शर्मा यांची गोळी झाडून आत्महत्या

मानसिकदृष्ट्या होते अस्वस्थ;व्यावसायिक क्षेत्रात खळबळ

अमरावती/प्रतिनिधी:- स्थानिक महेश नगर येथील रहिवासी तथा राजापेठ येथील प्रसिद्ध मिलन मिठाई चे संचालक अशोक होशियारसिंग शर्मा (वय ६०) यांनी रविवारी सायंकाळी ६. ४५ च्या सुमारास स्वतःच्या राहत्या घरी रायफलने छातीत गोळी झाडून आत्महत्या केली. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक शर्मा हे गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या आजारापायी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते. या विवंचनेतूनच त्यांनी हे जीवघेणे पाऊल उचलले. अशोक शर्मा यांच्या आत्महत्येमुळे व्यावसायिक क्षेत्रात मात्र एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक शर्मा यांचे कुटुंबीय आपल्या नातेवाईकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी रविवारी सायंकाळी 5.30 वाजता त्यांच्या घरी गेले होते. यावेळी अशोक शर्मा हे घरी एकटेच होते. संध्याकाळी 5.30 ते 7 च्या दरम्यान त्याने आपल्या बेडरूममध्ये 12 बोअर रायफलने आपल्या छातीत गोळी झाडली. जेव्हा कुटुंबातील सदस्य घरी आले त्यावेळी घराचा दरवाजा बंद दिसला. खूप प्रयत्न करूनही समोरून प्रतिसाद न मिळाल्याने कुटुंबीयांनी अखेर खिडकी तोडून आत्मधली स्थिती बहघीतली तेव्हा अशोक शर्मा रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडलेले दिसले. कुटुंबीयांनी तात्काळ राजापेठ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांच्या उपस्थितीत कुंडी तोडून दरवाजा उघडण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. सायंकाळ असल्याने रविवारी शवविच्छेदन होऊ शकले नाही. सोमवारी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.पुढील तपस राजापेठ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर यांच्या नेतृत्वात होत आहे.

१ वर्षापूर्वी झाला होता अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक शर्मा यांचा वर्षभरापूर्वी अपघात झाला होता. त्यामुळे त्यांच्या पायाचे हाड मोडले. प्रथम ऑपरेशननंतर त्यांच्या पायात स्टीलचा रॉड टाकण्यात आला. या समस्येने ते हैराण झाले होते. उपचाराचा खर्च व इतर कारणांमुळे ते नेहमी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहत होते. याच कारणावरून त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले असावे,असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. अशोक शर्मा यांना दोन भाऊ असून त्यांना एक मुलगा आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top