अखेर … ६० तासानंतर आढळला मत्स्य अधिकारी फिरके यांचा मृतदेह

सेलू / अभय बेदमोहता – बोरधरण येथे शनिवारच्या रात्री बोट उलटून झालेल्या अपघातात मत्स्य अधिकारी युवराज खेमचंद फिरके बोर धरणाच्या पात्रात बुडाले होते, दोन दिवसापासून एन डी आर एफ ची टीम सतत शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु फिरके यांचा मृतदेह आढळून आला नव्हता, अखेर मंगळवारी तिसऱ्या दिवशी सकाळी एनडीआरएफ व पुणे येथील विशेष पथकाने शोध मोहिमेला सुरुवात केली, ६० तासानंतर अखेर त्यांचा सकाळी ९ वा च्या सुमारास ज्या प्लॅटफॉर्म जवळ बोट उलटली होती. त्याच जागेवर खाली गाळा मध्ये फिरके यांचा मृतदेह फसलेला स्थितीत आढळून आला, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला, पुढील तपास सेलू पोलीस करीत आहे. सोमवारी घटनास्थळी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, पोलीस अधीक्षक नरुल हसन, तहसीलदार स्वप्नील सोनोने, परिस्थितीची पाहणी केली होती. तसेच सेलुचे ठाणेदार तिरुपती राणे व बिट जमादार श्रावण ठाकरे हे ६० तासापासून तळ ठोकून होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top