राम रहीमला पुन्हा पॅरोल

नवी दिल्ली,
बलात्कार आणि हत्या प्रकरणात २० वर्षांची शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमला पुन्हा एकदा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या राम रहीमला ३० महिन्यांत आठव्यांदा पॅरोल मिळाला आहे. रोहतकच्या सुनारिया तुरुंगात बंद असलेल्या गुरमीत राम रहीमला हरियाणा सरकारने पुन्हा पॅरोल मंजूर केला आहे. यावेळी डेरा सच्चा सौदाला २१ दिवसांसाठी आणखी एक पॅरोल देण्यात येणार आहे.

याआधी जानेवारी महिन्यात डेरा प्रमुखाला ४० दिवसांचा पॅरोल मिळाला होता. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही राम रहीम ४० दिवसांसाठी तुरुंगातून बाहेर आला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी राम रहीम तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो उत्तर प्रदेशातील बागपतच्या आश्रमात राहणार आहे. राम रहीमला २१ दिवसांचा पॅरोल मिळाली आहे, याचा अर्थ दोषीची तुरुंगातून तात्पुरती सुटका झाली आहे. गुरमीत राम रहीमला दोन नर्सच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात प्रत्येकी १० वर्षांची शिक्षा आणि पत्रकार रामचंद्र छत्रपती आणि डेरा सच्चा सौदाचे व्यवस्थापक रणजीत सिंग यांच्या हत्येशी संबंधित प्रकरणांमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. राम रहीम साध्वींच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात दिलेली शिक्षा वेगळी असेल. म्हणजेच या प्रकरणात त्याला एकूण २० वर्षांची शिक्षा भोगावी लागणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top