शिवाजी महाराजांचे वादग्रस्त चित्र सोशल मीडियावर प्रसारीत

रिध्दपुरात तणाव,चांदूरबाजारात निषेध,आरोपी अटक

वरीष्ठ पोलीस अधिकारी दाखल,चोख बंदोबस्त

चांदूरबाजार/वार्ताहर
चांदूरबाजार वरुन सहा कि.मी.वर असलेल्या रिध्दपुर येथे सोमवारी रात्री काही माथेफिरु तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वादग्रस्त फोटो सोशल मिडीयावर प्रसारीत केले.याची माहीती होताच रिध्दपुरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.याची तक्रार तेथील शिवप्रेमी तरुणांनी शिरखेड पोलीसात केल्यावरुन ठाणेदार सुरज तेलगोटे यांनी आपल्या पथकासह रिध्दपुर गाठुन त्या' माथेफिरु तरुणाला तातडीने ताब्यात घेऊन विशिष्ट समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी भारवी २९५ अ अन्यये गुन्हा दाखल केला.त्यानंतर रिध्दपुरातील तणाव निवळला. यात दोन्ही बाजुच्या शांतीप्रिय नागरीकांनी सामजस्याची भावना दाखवित गावात शांतता प्रस्थापीत केली.सुरक्षेचे उपाय म्हणून रिध्दपुरात अतिरीक्त बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहीती शिरखेडचे ठाणेदार सुरज तेलगोटे यांनी दिली. या घटनेचे पडसाद चांदूरबाजार येथेही उमटले.येथील शिवप्रेमी व हिन्दुत्ववादी संघटनेचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते जयस्तंभ चौकात एकत्र आले. त्यांनीजय भवानी,जय शिवाजी,जय श्रीराम च्या घोषणा देऊन रिध्दपुर येथील घटनेचा तिव्र निषेध केला.व निषेध मोर्चा काढून पोलीस स्टेशनवर धडक दिली.सुरक्षेचे उपाय म्हणून शहरात सरमसपुरा,सिरजगाव कसबा,ब्रा,थडी येथील पोलीस कुमक बोलावण्यात आली.नंतर सदर बंदोबस्त रीध्दपुर कडे पाठविण्यात आल्याची माहीती चांदूरबाजारचे ठाणेदार सुरज बोंडे यांनी दिली.
चांदूरबाजार येथील शिवप्रेमी व हिदुत्ववादी संघटनेचे आनंद अहिर,अतुल रघुवंशी,भुषण अहिर,गोलु पोकळे,शुभम पवार,सागर वानखडे,विक्की टेंभरे यांनी अचलपुर उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल नवगीरे यांचे उपस्थितीत ठाणेदार सुरज बोंडे यांना निवेदन देऊन या वादग्रस्त पोस्ट व्हायलर करणार्‍यावर त्वरीत कारवाईची मागणी केली.परिसरात शांतता असली तरी सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन चौकाचौकात पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे.या वादग्रस्त पोस्टची चौकशी सुरु असून यातील एका आरोपीला अटक करण्यात आली असली तरी पोस्ट व्हायलर करणार्‍यांची चौकशी सुरु असून पंचनामा करुन त्यांचेवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहीती शिरखेडचे ठाणेदार सुरज तेलगोटे यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top