सिडलेस लिंबू लागवडीतून शेतकऱ्यांनी साधली आर्थिक प्रगती

लाखोंची उलाढाल

अमरावती /वैष्णवी मांडळे
अस म्हणतात ‘शेतात काय पिकतं. त्या पेक्षा बाजारात काय विकत’ ? हे ज्याला कळतं त्याचा व्यवसायातून उत्कर्ष साध्य होतो. ह्रयाच म्हणीला सार्थकी लावत अमरावती जिल्हयातील चांदुररेल्वे तालुक्यातील युवा शेतकरी उज्जवल म्हसतकर यांनी पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून थायलंडचा सीडलेस लिंबू शेतात पिकवला. पुढे याच लिंबावर प्रक्रीया करुन त्यांनी बाजाराच्या मागणीनुसार लिंबाचे लोणचे तयार करुन अनन्या लेमनक्रश नावाने विकण्यास सुरुवात केली व शेतीप्रक्रिया उद्योगातून उत्पनाचा ‘उज्जवल’ प्रयोग साध्य केला.

अमरावती जिल्हयातील चांदुर रेल्वे येथील युवा उज्वल म्हसतकर या युवा शेतकऱ्यांनी बीएसस्सी डी- फार्म, पर्यंतचे शिक्षण पुर्ण करुन नोकरी न करता आपल्या शेती व्यवसाय करण्याचे ठरवले. आपल्या शिक्षणाचा पुरेपुर उपयोग शेतीसाठी करित त्यांनी वडिलोपार्जित ३ एकर शेतात दोन वर्षांपूर्वी बिया विरहित (सीडलेस) लिंबाची एक हजार झाडे लावली. इडलिंबूसारखे दिसणारे व काहीसा अंड्याचा आकार असलेले हे लिंबू विदर्भात नविनच होते. दोनवर्षानंतर उत्पन्न येण्यास सुरुवात झाली मात्र लिंबाला स्थानीक मागणी नसल्याने म्हसतकर यांनी पुण्याच्या बाजारापेठेत विक्रीस नेले. पुणेकरांना नविन असलेल्या या फळाची पडलेल्या भावाने मागणी केली. शेवटी ४० ते ५० रुपये किलोने तीन क्विंटल लिंबू विकून परतले. मात्र वाहतुकीसाठी येणारा खर्च परवडत नसल्याने त्यांनी स्थानिक पातळीवरच विक्रीसाठी प्रयोग सुरु केले.

सातत्याने नवतंत्रज्ञानाची व शेतीतल्या प्रयोगाची माहिती घेत त्यांनी शेतातील लिंबापासून क्रश व लिंबाचे लोणचे करुन विकण्यास सुरुवात केली. व आपल्या कल्पनेला चालना देत शेतीव्यवसायातून आपला विकास साध्य केला. शेतातल्या मातीचे त्यांनी परिक्षण करुन त्यांनी नाशिक येथील मित्रा यांच्याकडून ‘अनंतम लेमन’ ची रोप आणले. तीन एकराच्या शेतात १ बाय १ चे खडे करुन १२ बाय १० अंतरावर त्यांनी एक हजार झाडे लावली. ही झाडे लावतांना कल्चर, गांडूळ व शेणखताचा त्यांनी वापर केला. सोबतच पाण्यासाठी ड्रिपची व्यवस्था केली. २०१६ ऑगस्टमध्ये झालेली ही लागवड यशस्वी झाली. आणि २०१७ नोव्हेंबर डिसेंबरमध्ये लिंबाचे पहिले उत्पादन हातात आले.

या लागवडीसाठी त्यांना ३ लाख खर्च आला. अनंतम लेमन दिसायला मोठे म्हणजे २०० ते २५० ग्रॅमचे एक लिंबू असल्यामुळे आणि इतरांना त्यांची फारशी माहिती नसल्याने म्हसतकर यांना ग्राहकच मिळाला नाही. शेवटी त्यांनी पुण्यात राहणाऱ्या भावाच्या मदतीने तेथे जाऊन ४० ते ५० रुपये किलो भावाने त्यां लिंबांची विक्री केली. नेहमी ते परवडणारे नव्हते आणि अनंतम लेमनच्या झाडांना वर्षातून चार वेळा बार येत असल्यामुळे स्थानिक पातळीवरच या लिंबाचे काही करता येईल का याची चाचपणी त्यांनी सुरु केली. याच काळात त्यांना या लिंबाचे लोणचे तयार करुन ते विकण्याची कल्पना सुचली अन ती त्यांनी प्रत्यक्षात उतरवीली.

म्हसतकर यांनी सालासह लिंबू क्रश करुन त्यांचे लोणचे तयार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ठरल्याप्रमाणे ते लोणचे तयार झाले अनन्या क्रश लेमन पिकल हे नाव त्यांनी दिले. अनन्या हे त्यांच्या मुलीचे नाव आहे. मेहनत व नियोजन करुन त्यांनी लोणच्याचे मार्केटिंग केले. चांदूररेल्वे पूणे, अमरावती, धामणगाव रेल्वे येथे त्यांनी लोणचे विक्रीसाठी दिले. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.सोबत विविध कृषी प्रदर्शनीमध्ये सहभागी होवून लेमन पिकलची विक्री करण्यास सुरुवात केली. प्रदर्शनीच्या माध्यमातून त्यांनी गोंदिया, नागपूर, भंडारा, अमरावती येथून मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याने त्यांनी लिंबासोबतच लोणच्याचेही व्यापक उत्पादन करण्याची तयारी त्यांनी केली.

अनन्या महिला बहूउदेशीय या नावाने त्यांनी महिला बचत गट स्थापन केला. बचत गटाची व उत्पादनाची अधिकृत नोंदणी करुन काम सुरु केले. पाहता पाहता प्रतिसाद वाढत केला. ४० रुपयाला २०० ग्रॅम व १८० रुपयाला १ किलो असे लोणच्याचे दर त्यांनी ठेवले आहे. हे लोनचे फारच चवदार व पोष्टीक असून या लिंबाचाची सालही शरीरासाठी उपयोगी असल्याने अनेक औषधींसह सौंदर्य प्रसाधनांमध्येही ती वापरतात. पचनशक्ती सुधारणे, यकृत संरक्षण, शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करण्यास अनंतम लिंबू गुणकारी असून या लिंबात ब जीवनसत्त्व, पेटाथोनिक अ‍ॅसिड, पायरिडोक्सीन, फॉलिटेड हे तत्त्व असल्याचेही उज्ज्वल म्हसतकर यांनी सांगितले.

अनन्या लेमन क्रश ला सध्या गोंदिया अकोला, व वर्धा, अमरावती, पूर्ण येथून सातत्याने मागणी येते आहे. उत्पादनाचा वेग वाढायचा असल्यामुळे त्यांना मागणीची पूर्तता करण्यात अडचणी येत आहे. भाऊ आशुतोष, पत्नी व कुटूंबातले इतर सदस्य सहकार्याने या अडचनी दूर करण्यासाठी त्यांनी तातडीने पावले उचचली आहे. लोणचे उत्पादनाची गती लवकरच वाढेल. असे उज्जल म्हसतकर सांगिते. विशेष म्हणजे म्हसतकर यांनी लावलेले अनंतम लेमन पाहण्यासाठी विदर्भातील शेतकरी व अभ्यास शेताला भेटी देत आहे. जिद्द, चिकाटी, कल्पक्ता व नियोजनाच्या जोरावर उज्जवर म्हसतकर यांनी शेतीप्रक्रीया उद्योगातून उत्पनाचा उज्जवल प्रयोग साध्य केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top