शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या युवकावर कठोर कारवाई करा

जुळ्या शहरातील विविध संघटनातर्फे मागणी

अचलपूर (प्रतिनिधी ):-सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणारे मोर्शी तालुक्यातील रिद्धपुर येथील त्या युवकांविरोधात तीव्र पडसाद संपूर्ण अमरावती जिल्ह्यात उमटत आहेत .या घटनेच्या अनुषंगाने अचलपूर- परतवाडा जुळ्या शहरातील विविध संघटनेच्या वतीने अचलपूर चे तहसीलदार संजय गरकल यांना दिलेल्या निवेदनातून या प्रकरणातील आरोपीला अटक करून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली .या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले की,महाराष्ट्र राज्याचे नव्हे तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट तयार करून सोशल मीडियावर रिद्धपूर येथील युवकाकडून पसरविण्यात आली .महापुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही .या गंभीर प्रकाराबाबत गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे .यावेळी गजानन कोल्हे, सुधिर रसे, अभय माथने, प्रविण मेहरे, अभय वाजपेयी, गजानन शर्मा, विनय चतुर, विजय मिश्रा, योगेश थोरात, सतीश शर्मा, प्रविण तोंडगांवकर, निलेश सातपुते, दिनेश लाड, हेमंत धाकतोड, संजय सावरकर, ऋषिकेश विजयकर, विक्की सोनपरोते, अक्षय जनवारे, राजेंद्र जयस्वाल, प्रमोद नैकिले, पवन वैरागडे, छोटु लाडोळे, आशिष राठोड, ऋषिकेश विजयकर, गोलु हेडाऊ, निलेश पोटे, प्रथमेश सोनपरोते, निखील लव्हाळे, प्रफुल्ल कुकडे, निलेश केळकर आदि मोठया संख्येने उपस्थितीत होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top