रिध्दपुरात शांतता,चांदूरात कडकडीत बंद

आरोपीची संख्या तीन, एकाची तुरुंगात रवानगी

भाजपाची विषवल्लींना तडीपार करण्याची मागणी

चांदूरबाजार-  शिरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रिद्धपूर येथे दि.२० नोव्हे. रोजी सोशल मीडियावर छत्रपती  शिवाजी महाराज यांची आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली असल्यामुळे तमाम शिवप्रमियांच्या  भावना दुखावल्या. यांच्या निषेधार्थ दि.२१ नोव्हे.ला शिवप्रेमी रिद्धपूर बंद ची हाक देऊन रस्ता रोको आंदोलन व कडकडीत बंद ठेवण्यात आला होता .त्याचे पडसाद चांदूरबाजारात उमटले. २० ला सर्व हिदुत्ववादी संघटनांनी पोलीस स्टेशनवर धडक देऊन निषेध नोंदविला व कडक कारवाईचे निवेदन दिले,तर २२ बुधवारी भाजप व शिवप्रेमींनी चांदूरबाजार बंदची हाक दिली.त्याला व्यापार्‍यांनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन कडकडीत बंद पाळला.यानंतर भाजपचे तालुकाध्यक्ष मुरली माकोडे सरचिटणीस गोपाल तिरमारे यांच्या नेतृत्वात तहसिलदार गितांजली गरड यांना निवेदन देऊन शिवाजी महाराजांची बदनामी करणार्‍या विषवल्लींना तात्काळ जिल्हा बंदीची मागणी केली.यावेळी चांदूरबाजारचे ठाणेदार सुरज बोंडे यांच्या मार्गदर्शनात कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. शिरखेड पोलीस स्टेशन चे ठाणेदार सूरज तेलगोटे यांनी २० नोव्हे रोजी आक्षेपार्ह पोस्ट व्हायलर करणार्‍या शाहरुख खान इस्राईल खान २५  याला अटक करून त्याचा मोबाईल  जप्त  केला.या प्रकरणात फिर्यादी पोलीस हवालदार संजय वाघमारे यांच्या तक्रारी नुसार पोलीसांनी आरोपीवर कलम २९५ अ भारतीय दंड सहिता प्रमाणे गुन्हा दाखल  करण्यात आला संशयित आरोपी शाहरुख खान इस्राईल खान यांचे अटके दरम्यान पोलिसांनी गन्हाचा तपास केला असता सदर आक्षेपार्ह पोस्ट शाहरुख खान यांचे रिद्धपूर येथील राहणारे मित्र अब्दुल जमील अब्दुल कबीर ,वय १९  व तनजील अहमद अब्दुल नईम वय १८  यांनी सुद्धा सदर आक्षेपार्ह पोस्टचे स्टेटस स्वतःच्या व्हॉट्सॲप ला ठेवल्याचे तांत्रिक तपासात पुराव्या निशी निष्पन्न झाल्यामुळे दि.२१ नोव्हे रोजी त्या दोघांना सुद्धा नमूद दाखल गुन्हात आरोपी बनून अटक करण्यात आली आहे. व दि.२०,ला अटक करण्यात आलेल्या संशयित  आरोपी शाहरुख खान इस्राईल खान याला  दि.२१ रोजी मा. न्यायालयात मोर्शी येथे हजर केले असता मा.न्यायलयाने आरोपीची न्यायालयीन कोठडी मंजूर करून जेलमध्ये पाठविले आणि काल दोन आरोपी यांना अटक करण्यात आलेल्या आरोपीचा शिरखेड पोलीस कसून तपास करत असून आज पर्यंत सदर गुन्हामध्ये एकूण तीन आरोपी अटक करून सर्व कायदेशीर कारवाई करण्यात आल्यामुळे सध्या रिद्धपूर गावातील तणाव निवळला असुन शांतता आहे.

रिद्धपूर आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणात

एकूण ३ आरोपी यांना वेळीच अटक करण्यात आली आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवेवरून विश्वास ठेऊ नये  कोणीही सोशल मीडियावर कुणाच्या धार्मिक भावना दुखावतील असे लिखाण करू नये व पोस्ट करू नये सध्या रिद्धपूर येथे शांततापूर्ण वातावरण आहे –

सूरज तेलगोटे, ठाणेदार शिरखेड पोलीस स्टेशन

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top