रविवारी पुण्यात मध्यस्थीचा वधू-वर परिचय मेळावा

आकोट-
श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था आकोट अंतर्गत गठीत मध्यस्थी वधू-वर सुचक मंडळाचे पुणे विभागीय शाखेच्या वतीने उपवर युवक युवती व त्यांचे पालकांचा मेळावा रविवार दि.२६ नोव्हेबरला स.११ वा. संपन्न होत आहे. रेडी समाज मंगल कार्यालय देहू फाटा आळंदी येथे आयोजीत मेळाव्याला पुणे मुंबई नासिक विभागातील निवासी विदर्भीय मराठा युवक युवती व त्यांचे पालक उपस्थित राहणार असून या मेळाव्याला आ.बच्चू कडू,आ.सुनिल अण्णा शेळके, सेवानिवृत्त सहा.धर्मदाय आयुक्त बळीराम पाटील मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प वासुदेवराव महाराज महल्ले व ह.भ.प.बळीराम महाराज मेहूणकर यांचे हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन होईल.

या प्रसंगी पिंप्री चिंचवड मनपाचे माजी नगरसेवक सुरेश नढे पाटील,मध्यस्थी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब फोकमारे ,उद्योजक सुनिल रहाटे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. गत सात वर्षा पासून पुणे विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून विदर्भीय मराठा समाज बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.यावर्षी आयोजित या मेळाव्याच्या नियोजना नुसार स.११ वा. मेळाव्याचे उद् घाटन,१२ ते २ परिचय सत्र,दु.२ ते २.३० स्नेहभोजन, २.३० ते ५ परिचय सत्र व समारोप असा कार्यक्रम आहे. या मेळाव्याला विवाह इच्छूक युवक युवती व त्यांचे पालकांनी उपस्थित रहावे असे आवाहन पुणे शाखाध्यक्ष महादेवराव सावरकर,उपाध्यक्ष कॕप्टन सुनिल डोबाळे, सचिव वैभव टेकाडे,रामदेव शेळके,संतोष माळी,दिपक धुमाळे,नितिन सावरकर,अनिरुद्ध काळे,अतुल गावंडे,विवेक दोड,जितेंद्र संभारे, अरविंद कावरे,मनोज दगडकर,सुजित हिंगणकर यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top