हारे का सहारा बाबा श्याम हमारा जयघोषाने दुमदुमले अचलपूर – परतवाडा

अचलपूर (प्रतिनिधी)- लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या राजस्थान येथील खाटू श्याम बाबा यांच्या जन्मदिनानिमित्त अचलपुरात आज भव्य निशान यात्रेचे आयोजन करण्यात आले होते .अचलपूर शहरातील लोहार लाईन हत्ती वाला मंदिर येथून श्याम बाबाची निशान यात्रा काढण्यात आली. बुद्धे खा चौक, सराफा लाईन, पोलीस चौकी, देवडी ,अकबरी चौक, टक्कर चौक, चावल मंडी, सोनवाल चौक, दुल्हा गेट मार्गे परतवाडा येथील श्याम बाबा मंदिर पर्यंत ही यात्रा काढण्यात आली.निशान यात्रेचे देवडी येथे आगमन होताच भाविकांनी श्याम बाबाची आरती , हार अर्पण करीत स्वागत केले. रस्त्यावर ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
या निशान यात्रेमध्ये मोठ्या संख्येने महिला व पुरुषांनी सहभाग घेतला संपूर्ण अचलपूर शहर हारे का सहारा श्याम हमारा या जयघोषाने दुमदुमले.या निशान शोभायात्रेमध्ये भूपेंद्र पूरबगोला, पंकज अग्रवाल, अभिषेक सातपुते, कुणाल चौधरी, आनंद चौधरी, सारंग कयाल, संतोष महाराज शर्मा, नारायणदास पूरबगोला, प्रथमेश पुरबगोला, गजानन फिस्के, अनिकेत मिश्रा यांनी परिश्रम घेतले. श्याम बाबा चा जन्मोत्सव आनंदात ,उत्साहात साजरा करण्यात आला.ठीक ठिकाणी नागरिकांनी पुष्प वर्षा केली तसेच मिष्टान ,चॉकलेट , सुखामेवा चे वाटप करण्यात आले.या दरम्यान अचलपूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार सुरेंद्र बेलखेडे यांच्या नेतृत्वाखाली संजय खंडारे, हवालदार अवधूत सगणे, हवालदार श्रीकांत वाघ ,अमरसिंग जांभेकर ,राहुल कपले ,मोहन वावरे आदी पोलीस कर्मचान्यांनीचोख बंदोबस्त ठेवला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top