एकाच दिवशी ४५ हजार मका व सोयाबीन पोत्यांची आवक

अचलपूर (प्रतिनिधी)- अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये २३ नोव्हेंबर गुरवार रोजी मोठ्या प्रमाणात मका व सोयाबीनच्या धान्याची आवक झाल्याने शेतकऱ्यांच्या धान्य भरलेल्या वाहनांना उभे राहण्यासाठी जागाही अपूरी पडत होती.सकाळपासुन सुरु झालेल्या आवकमुळे बाजार समितीत शेतकरी व धान्य पोत्यांची गर्दी सर्वत्र दिसुन येत होती. एकाच दिवशी एवढी आवक झाल्याने बाजार समिती सभापती, संचालक व कर्मचाऱ्यांनी विशेष लक्ष ठेऊन लवकरात लवकर माप करण्याची यंत्रणा सक्रिय करण्यात आली.अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मका २५ हजार पोते तर सोयाबिन २० हजार पोत्यांची आवक झाली होती. बाजार समितीत अडत्या व्यापाऱ्यांनी बोली बोलत हर्रासात भाग घेऊन धान्य खरिदीला प्राधान्य दिले. बाजार समितीत मका १६०० ते २५०० रुपये प्रति क्विंटल तर सोयाबिन ४८०० ते ५१५० या दरात खरेदी करण्यात आली .

तत्काळ खरिदी व नगदी चुकारा…
अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांनी धान्य विक्रीला आणल्यानंतर हर्रास होताच तत्काळ खरिदी व मोजमाप करत शेतकऱ्यांना नगदी, आरटीजीएस व धनादेश देऊन चुकारा केल्या जातो. त्यामुळे शेतकरी योग्य भाव नगदी चुकारा असल्याने या बाजार समितीला प्राधान्य देतात .

-सतिषकुमार व्यास, संचालक कृ.उ.बा.स, अचलपूर

धान्य मोजणीसाठी संचालक पोपट घोडेराव सक्रिय…

अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरवारी मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने बाजार समिती यंत्रणा सक्रिय होतीच. सोबतच संचालक पोपट घोडेराव शेतकऱ्यांच्या धान्य मालाचे माप लवकरात लवकर कशा प्रकार होईल याकडे लक्ष देऊन होते.

सुविधेला प्राधान्य

अचलपूर बाजार समितीतील शेतकरी, अडत्या, व्यापारी, हमाल मापारी, यांच्या माध्यमातून आवश्यक त्या सुविधा बाजार समितीत उपलब्ध करुन दिल्या जात आहे. याकरीता सभापती राजेंद्र गोरले व उपसभापती अमोल चिमोटे संचालक मंडळ, सचिव अमर वानखडे, सहसचिव मंगेश भेटाळू आदि सक्रिय असुन लक्ष देऊन आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top