अचलपुर येथे तीन दिवसीय भव्य राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन

अचलपुर केसरी साठी चांदीची गदा व रोख बक्षीसे

माजी पालकमंत्री प्रवीण पोटे करणार उद्घाटन

अचलपूर (प्रतिनिधि):- अचलपुर शहरांतील विठ्ठलवाडी मैदानावर तीन दिवसीय भव्य राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन श्री हनुमान व्यायाम मंडळ बिलनपुरा अचलपूर द्वारा करण्यात आले असून येत्या ४ ,५ व ६ डिसेंबर ३ दिवस स्पर्धा चालणार असून महाराष्ट्र राज्य कुस्ती संघटना व विदर्भ कुस्ती संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे . यावेळी अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांची प्रमुख उपस्थितीती राहणार आहे .
डिसेंबर महिन्यात अचलपूर येथे मॅट वर खेळल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . या स्पर्धेत भाग घेण्यासाठी राज्यभरातून पैलवान येणार असून लाखो रुपयाचे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते वितरित होणार आहे . पुरुषांमध्ये अचलपूर केसरी प्रथम बक्षीस अचलपूर केसरी चांदीची गदा , व ७१ हजार रुपये रोख .द्वितीय पुरस्कार ३५ हजार रुपये ,तृतीय पुरस्कार ११ हजार रुपये दिल्या जाणारा असून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सोमेश सुनील खानझोडे यांच्या वतीने खानझोडे कन्स्ट्रक्शन द्वारा चांदीची गदा अचलपूर केसरी साठी विजेत्याला दिली जाणार आहे . तर महिला गटात अचलपूर केसरी विजेत्या स्पर्धकाला ३१ हजार रुपये , द्वितीय १५ हजार रुपये तर तृतीय ७ हजार रुपये मिळणार आहे .खानझोडे कन्स्ट्रक्शन द्वारा चांदीची गदा देखील विजेता महिला स्पर्धकांना देण्यात येणार आहे .तसेच महिला आणि पुरुषां व्यतिरिक्त १७ वर्षा खालील कुमार कुमारिका गटाचेही स्पर्धा होणार आहे .
या स्पर्धेत भाग घेणाऱ्या १७ वर्ष आतील गटातील स्पर्धकांना जन्माचे प्रमाणपत्र ,आधार कार्ड अथवा शाळेचे बोनाफाईड स्पर्धा स्थळी आणणे गरजेचे आहे या स्पर्धेकरिता बाहेर ठिकाना हुन येणाऱ्या स्पर्धा का करीता राहण्याची व जेवण्याची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली असूनस्पर्धेचे उद्घाटन अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार प्रवीण पोटे यांच्या हस्ते होणार असून महाराष्ट्र राज्य कुस्ती संघटना व विदर्भ कुस्ती संघ तसेच श्री हनुमान व्यायाम मंडळ विलनपुरा अचलपूर यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून राज्यातील पैलवानांनी मोठया संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजक अभय माथने , छोटू लाडोळे , निलेश पोटे, चंद्रेश बहोरिया , गजू दीक्षित,धर्मा राऊत, कमलेश केदार यांच्याशी संपर्क साधण्याच्या आवाहन करण्यात आले आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top