रेल्वे प्रवाशी संघटनेकडून ‘अकोट ब्रॉडगेज मार्गाचा’ पहिला वर्धापनदिन साजरा

अकोट/प्रतिनिधी

भारतातील रेल्वे मार्गांचा विकास करण्या अंतर्गत दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत येणाऱ्या अकोला – अकोट मीटरगेज चे रूपांतर ब्रॉडगेज मध्ये करण्यात आले. वर्षभरापूर्वी २३ नोव्हेंबर 2022 ला अकोला – अकोट ब्रॉडगेज सुरु करून पहिली डेमू या मार्गावर धावली. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन पद्धतीने ०७७१८ अकोला-अकोट पॅसेंजरला हिरवी झेंडी दाखवली होती. लोकप्रतिनीधी व प्रवाश्यांची उत्साहाने या पॅसेंजरचे स्वागत केले होते. अकोट ब्रॉडगेज मार्ग प्रथम वर्धापनदिनला अकोट रेल्वे प्रवाशी संघटनेकडून रेल्वे स्टेशन मास्टर संतोष मसाने यांचा सत्कार करण्यात आला. सोबतच प्रवाशी संघटनेकडून प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सदर निवेदन अकोट रेल्वे प्रवाशी संघटनेचे विजय जितकर, सुरेश भाई सेजपाल, रामदास काळे, लकी इंगळे, रमण अग्रवाल, मनोज गुप्ता, राजकुमार भगत आदींच्या वतीने देण्यात आले.

या आहेत मागण्या
अकोट येथे लोकोरिव्हर्सल सुविधा पूर्ण करून अकोला पर्यन्त येणाऱ्या रेल्वे अकोट पर्यंत विस्तारित कराव्यात. अकोट स्टेशनवर लाईट, प्रसाधनगृह, पाण्याची सुविधा त्वरित उपलब्ध करून द्याव्यात. रात्रीच्या वेळी आरपीफ गस्त वाढवणे. अकोट येथे आरक्षण खिडकी सुरु करावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top