श्री नरसिंग महाराज यात्रा महोत्सव २०२३

अकोट/प्रतिनिधी-
दरवर्षी प्रमाणे श्री नरसिंग महाराज यात्रा महोत्सव निमित्य दि.२८नोव्हेंबर रोजी वार मंगळवार ते ११डिसेंबर रोजी पर्यंत श्री नरसिंग महाराज मंदिरात दररोज भजन,प्रवचन, हरिपाठ, भारुड,नाम संकीर्तन ई. कार्यक्रम आयोजित केले आहे. तरी कार्यक्रमास उपस्थित राहून श्री दर्शनाचा व प्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा हि विनंती. सर्व वैदरभियांचे दैवत असलेले संतूश्रेष्ठ नरसिंग महाराजांची यात्रा गुलाबी थंडीची लज्जत वाढविण्यासाठी आली असून यात्रेचे विविध कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत.
दिनांक २८नोव्हेंबर रोजी कार्तिक वद्य !! १!! श्री तीर्थ स्थापना सकाळी ९ वाजता. दिनांक ३०नोव्हेंबर रोजी कार्तिक वद्य !! ३ !! श्री संत मियासाहेब यांची तक्त स्थापना सकाळी ९ वाजता. तसेच कार्तिक मास काकडा आरती समाप्ती. दिनांक १डिसेंबर रोजी कार्तिक वद्य !! ४ !! श्री नरसिंग महाराज यांची पालखी श्री गुरुपुजे (संदल) करिता गुरुस्थानी उमरा ता. आकोट ( आकोट पासून ९ किलो मीटर अंतर) येथे ह भ प अनंतराव देशमुख (कुटासा) यांचे प्रमुख सहभागात दुपारी ०१ वाजता निघेल तसेच श्री गुरुपूजे नंतर संध्याकाळी ६ वाजता अग्रसेन चौक, पोपटखेड रोड येथून श्री पालखी मिरवणूक श्री नरसिंग मंदिरात परत येईल. दिनांक २डिसेंबर रोजी कार्तिक वद्य !! ५ !! श्री नरसिंग महाराज यांची यात्रा (विविध धार्मिक कार्यक्रम) दिनांक ३डिसेंबर रोजी कार्तिक वद्य !! ६ !! श्री नरसिंग महाराज यांची पालखी सकाळी ०९ वाजता ह भ.प. अनंतराव देशमुख (कुटासा) यांचे प्रमुख सहभागात श्री नरसिंग मंदिरातून निघेल.व दुपारी ४ वाजता श्री पालखी मिरवणूक श्री मंदिरात परत येईल व नंतर गोपाळकाला (दहीहांडी) तसेच महाप्रसाद. दिनांक ०५डिसेंबर रोजी कार्तिक वद्य !! ८ !! श्री हरीनाम सप्ताहाची समाप्ती सकाळी ०९ वाजता ह.भ.प. प्रभाकर बुवा सरोदे ( आकोट ) यांचे काल्याचे कीर्तन सकाळी ११ वाजता.दिनांक १०डिसेंबर रोजी कार्तिक वद्य !! १२ !! श्री नरसिंग महाराजांचे समाधीस सकाळी ६ वाजता रुद्राभिषेक व सकाळी ९ वाजता श्री गाईची पूजा (गोतांबील). दिनांक ११डिसेंबर रोजी कार्तिक वद्य !! १३ !! श्री संत मियासाहेब यांचे तक्ता समोर काकडा आरती, भजन, गोपाळकाला प्रक्षाळ पूजेचे भजन, रात्री ०८ ते १० पर्यंत. (श्री नरसिंग महाराज यात्रा महोत्सव कार्तिक वद्य !! ५ !! झाल्यानंतर पुढील ५ बुधवार व रविवार पावेतो सुरु राहील)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top