श्री कार्तिक स्वामी मंदिरामध्ये कार्तिक मास उत्सव

अचलपूर (प्रतिनिधी)- राज्यामध्ये अतिप्राचीन, प्रसिध्द अचलपूर शहरातील श्री कार्तिक स्वामी मंदिरामध्ये कार्तिक मास उत्सव निमित्त नुकतेच २३ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर पर्यंत श्री कार्तिक स्वामी भक्त मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
अचलपूर शहरातील अतिप्राचीन श्री कार्तिक स्वामी मंदिर अमरावती जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात प्रसिध्द आहे.कार्तिक पौर्णिमे निम्मित दर्शनासाठी भाविक- भक्त अनेक जिल्ह्यातून येतात. यावर्षी कार्तिक मास २०२३ निम्मित दररोज काकडा आरती मध्ये भाविक मोठया संख्येने सहभागी होत आहे. नुकतेच २३ नोव्हेंबर पासून सायंकाळी लेझिम पथकासोबत पालखी फेरी चे आयोजन केले जात आहे.आणि २३ नोव्हेंबर ला श्री खाटू श्याम प्रगटोत्सव आणि भजन संध्या उत्साहात संपन्न झाली आहे. २४ नोव्हेंबर ला तुलसी विवाह व महिला भजन संध्येचा कार्यक्रम संपन्न झाला.आणि उद्या २५ नोव्हेंबर सायंकाळी हिंदू जनजागरण समितीचे जिल्हा समन्वयक मनिष टवलारे यांचे व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . रणरागिणी शाखा जिल्हा समन्वयक अनुभूती टवलारे यांची प्रमुख उपस्थितीती राहणार आहे.आणि २६ नोव्हेंबर रोजी परिसरात दीपोत्सव व सत्कार समारंभाचा आयोजन करण्यात आले आहे. यानंतर कार्तिक पौर्णिमा २७ नोव्हेंबरला सोमवारी पहाटे ३ वाजता कृतिका नक्षत्रात १०१ भाविक – भक्तांकडून भगवान कार्तिक स्वामी मूर्तीचे अभिषेक ,सकाळी ५ वाजता प्रभात फेरी ,सकाळी ६ वाजता महाआरती ,सकाळी ६.३० वाजता आरतीनंतर भाविक – भक्ताना दर्शन करता येणार आहे .यासाठी श्री कार्तिक स्वामी भक्त मंडळाचे अध्यक्ष राजेश काशीकर , कोषाध्यक्ष सुरेश लोंधे ,सचिव हेमंत सुंडेवाले , वरिष्ठ सल्लागार विलास काशिकर,अशोक खंडेलवाल यांच्यासह भक्त मनोहर शेरेकर,युवराज परीहार, अनिल शेटे, गोपाल झंवर, जनरावजी राऊत ,डॉ.पांडुरंग दवंडे,दीपक काशिकर,संजय लहाने,सूरज चरोडे,अभय शेरेकर ,अमोल काशीकर ,वीरेंद्र तट्टे , जय घीया,राकेश सूंडेवाले, आशिष शेटे, जय सूंडेवाले, आनंद चरपटे, अमेय आश्टोनकर,श्याम निराटकर,तेजस काळे ,गोपाल सोनोने , कृताण काशिकर , राम मासुदकर आदी भाविक – भक्त,नागरिक ,तरुण मंडळी तसेच श्री कार्तिक स्वामी भक्त मंडळाचे सदस्य मोठया संख्येने परिश्रम घेत आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top