जुन्या वादातून दोन गटांमध्ये वाद

दोन गंभीर जखमी;कडबी बाजार पोलीस चौकीतील घटना

अमरावती/प्रतिनिधी:-जुन्या वादातून नागपूरी गेट पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या कडबी बाजार स्थित असलेल्या गुन्हे शाखेच्या कार्यालयातच दोन गट आमने सामने झाले.या वादात दोन्ही गटातील युवकांनी एकमेकांवर चाकूने हल्ला चढविला.यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले असून काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर अन्य आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहे.रात्री उशिरा ही घटना घडली असून यातील एका जखमीची हालत नाजूक असल्याचे समोर आले आहे.पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन स्थिती सांभाळली ज्यामुळे पुढील अनर्थ टळला.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी बाबा होगा उर्फ शेख जमीर याने दोन वर्षांपूर्वी मन्नू उर्फ शेख सलीम याच्यावर प्राणघातक हल्ला चढविला होता.सदर प्रकरण सध्या न्यायालयात आहे.या प्रकरणाचा काही दिवसानंतर निर्णय सुद्धा होणार आहे मात्र बाबा शेख जमीर याने मन्नू उर्फ शेख सलीम यांच्यावर सदर प्रकरण मागे घेण्याचा दबाव काही दिवसांपासून सुरू आहे.ज्यामुळे दोन्ही गटांमध्ये मोठ्या प्रमाणात खुन्नस वाढली होती.सदर प्रकरणात पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की दोन्ही गटांमध्ये येत्या काही दिवसात वाद निर्माण होणार आहे.ज्यामुळे पोलिसांनी सतर्कतेच्या दृष्टिकोनातून मन्नू व बाबा यांना विचारपूस करण्याकरिता कडबी बाजारातील पोलीस चौकीत २४ नोव्हेंबर रोजी रात्री बोलविले होते.
पोलिसांच्या आदेशानुसार दोघेही पोलीस चौकीत उपस्थित झाले.यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक सुद्धा होते मात्र काही समजण्याच्या अगोदरच दोन्ही गटांनी एकमेकांवर प्राण घातक हल्ला चढविला.यामध्ये नहिल अहमद नदील अहमद व अब्दुल अनिक अब्दुल रफिक हे दोघे गंभीर जखमी झाले.घटनेच्या नंतर काही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.दोन्ही आरोपींना उपस्थितांनी जिल्हा सामान्य रुग्णालय दाखल केले.यामध्ये नहील अहमद याची परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्याला खाजगी दवाखान्यात उपचाराकरिता पाठविण्यात आले आहे.घटना ची माहिती एसीपी पूनम पाटील यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले व परिस्थितीचा आढावा घेतला.सदर प्रकरणात ही माहिती सुद्धा समोर आली आहे की,काही वर्षांपूर्वी झालेल्या गांजा तस्कर असलेल्या नानिका हसन हत्याकांड प्रकरणात सुद्धा दोन्ही गटांमध्ये मोठ्या प्रमाणात खुन्नस होती तसेच न्यायालयात चालू असलेल्या प्रकरणामुळे सुद्धा दोन्ही गटांमध्ये खुन्नस होती.ज्यामुळे आज हा वाद घडला पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असून बातमी लिहूस्तर पोलीस आपली पुढील कारवाई करीत होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top