कृ.ऊ.बा.समितीचे सभापती व संचालक मंडळाची सामाजिक बांधिलकीतून ठेवला नवा आदर्श

संचालक मंडळ व कर्मचारी शेतकऱ्यासाठी झाले आचारी

अचलपूर (प्रतिनिधी)- एकिकडे निसर्गाचा लहरीपणा तर दुसरीकडे ऊन, वारा, पाऊस सोसत मोठ्या कष्टाने पीक उत्पादित करून विविध धान्य विक्रीसाठी अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेल्या १४०० शेतकऱ्याना सामाजिक बांधिलकीतून अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र गोरले, उपसभापती अमोल चिमोटे, व समस्त संचालकांनी पुढाकार घेत रात्रीला मुक्कामी असलेल्या शेतक-यांसाठी भोजनाची व्यवस्था केल्याने सर्वत्र या उपक्रमाचे कौतुक होत आहे .
अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या २३ नोव्हेंबर गुरुवार रोजी मोठ्या प्रमाणात सोयाबिन व मका या धान्याची आवक झाली. मध्यप्रदेश व शेतकऱ्यांची संख्या अधिक असल्याने शेतकयांनी विकलेल्या धान्याचे माप व चुकारा करण्यासाठी बराच वेळ निघून गेल्याने मोठ्या संख्येने असलेल्या शेतकऱ्यासाठी जेवणाची व्यवस्था व्हावी या हेतुने सामाजिक बांधिलकीतून सभापती राजेंद्र गोरले यांनी पुढाकार घेत बाजार समितीच्या सभागृहात शेतकऱ्यांची पंगत बसवुन त्यांच्या जेवनाची व्यवस्था केली. या व्यवस्थेकरीता सभापती राजेंद्र गोरले, संचालक पोपट घोडेराव, भावेश अग्रवाल, व इतर संचालकांसह बाजार समितीचे कर्मचारी अमर वानखडे, मंगेश भेटाळू, व समस्त कर्मचाऱ्यांनी वेळेवरच भोजनासाठी लागणाऱ्या साहित्याची व्यवस्था करत स्वतःच हे भोजन तयार केले. व सर्व शेतकऱ्यांना सम्मानाने आमंत्रीत करत त्यांची पंगत बसविली. त्यांना जेवण वाढण्यासाठी सभापती, संचालक व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही व्यवस्था प्रशंसनिय ठरली.भोजनाची व्यवस्था करायची असल्याने मग वेळेवर साहित्य व आचाऱ्याची व्यवस्था कशी करावी यात वेळ न घालविता बाजार समितीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याने सहभाग घेऊन कुणी भाजीपाला चिरायला घेतला तर कुणी तांदुळ व डाळ धुवाय ला घेतली तर कुणी फोडणी घालण्यात व्यस्त होते. तर कुणी वाढण्यात व्यस्त होते. अशा प्रकारे बाजार समितीच्या कर्मचायांनी एकीची वज्रमुठ करत प्रत्येक काम अत्यंत तन्मयतेने करत शेतकऱ्यांना पोटभर जिव घालत तृप्त केले.

शेतकऱ्यांची सेवा हे तर आमचे कर्तव्यच…
बाजार समितीत काल मोठया प्रमाणात धान्याची आवक झाल्याने धान्य माप करण्यास उशीर होत असल्याने मध्यप्रदेश व मेळघाटातील शेतकऱ्यांना गावी जाण्यास शक्य नव्हते .त्यामुळे रात्री १२०० ते १४०० शेतकऱ्यांसाठी भोजनाच्या व्यवस्थेसोबत त्यांच्या निवासाची व्यवस्था केली हे आमचे कर्तव्यच नव्हे तर ती आमची जवाबदारी सुध्दा आहे.
-राजेंद्र गोरले, सभापती, कृउबास अचलपूर.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top