बस स्थानकप्रसाधन गृह चालकाला प्रशासनाने दिली समज

नागरिक हक्क संरक्षण समितीच्या सुचनेची दखल

अकोट/प्रतिनिधी- नागरी हक्क समितीने दर्यापुर आगार व्यवस्थापकाना येथील बस स्थानक परिसरातील प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या प्रसाधन गृहाची तातडीने दुरुस्त करण्याबाबत व नियमित साफसफाई ठेवण्याबाबत दिलेल्या निवेदनाचा तसेच त्या साठी जन आंदोलन करण्याचा इशारा दिल्याबरोबर ताबडतोब महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अमरावती च्या विभागीय अभियंता यांचे कार्यालयाने तातडीने तक्रारी ची दखल घेऊन बस स्थानक परिसरात असलेल्या प्रसाधनगृहाची देखरेख व व्यवस्था ठेवणाऱ्या सफाई कामगार समाजसेवी संस्थेला ताबडतोब नियमित देखभालीच्या सूचना देऊन समज दिली तसेच तिनं दिवसाचे आत दुरुस्ती न केल्यास व अशा प्रकारे जनतेच्या तक्रारी आल्यास आपला सफाई परवाना रद्द होईल अशी सक्त ताकीद कार्यालय पत्र क्रमांक ११५६ नुसार दिली असल्याचे स्थानिक आगार व्यवस्थापक यांनी नागरी हक्क संरक्षण समिती चे अध्यक्ष एड संतोष कोल्हे यांना एका पत्राद्वारे कळविले आहे .
गेल्या काही दिवसापासून नागरी हक्क संरक्षण समितीने शहरातील व तालुक्यातील अनेक सामाजिक प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने धडक मोहीम सुरू केली आहे त्यातलाच एक भाग म्हणून दर्यापूर बस स्थानकातील प्रवासी स्त्री-पुरुषांच्या करीत असलेल्या प्रसाधनगृहाची दूर्दशा स्थानीक प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती व कार्यवाही न केल्यास जन आंदोलनाची सुचना आगार व्यवस्थापक यांना भेटून दिली होती हे विशेष.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top