प्रज्ञा वाचनालय गंभीर अवस्थेत…

गाव तिथे ग्रंथालय ग्रंथालयात सुविधा नाही

वर्धा/ रवींद्र लाखे :- प्रज्ञा वाचनालय , सेलडोह, ता. सेलू, येथे आमच्या प्रतिनिधीने भेट दिली असता, वाचनालय दयनीय अवस्थेत दिसून आले, महाराष्ट्र शासनाने गाव तेथे ग्रंथालय योजना सुरू केली, वाचन संस्कृती वाढावी, समाजातील घटकांना त्याचा फायदा व्हावा, विद्यार्थ्यांना अभ्यासिका मिळावी, असा शासनाचा उद्देश होता याकरिता शासन अनुदान देत असते, या अनुदानातून वाचनालयात मासिके, वर्तमानपत्र, पुस्तके खरेदी करणे बंधनकारक आहे. परंतु, वाचनालयाचे चालक, हे काही न करता अनुदान लाटणे हा एकमेव कार्यक्रम चालवतात, सेलडोह येथील वाचनालय ‘ क’ दर्जाचे असून दिड लाख रुपये वार्षिक अनुदान येतात , ग्रंथपाल आणि चपराशी असे दोन पद येथे मंजूर असून, कुणी कर्मचारी हजर दिसले नाही, ना वर्तमान पत्र, ना मासिके, निवळ अनुदान लाटण्याकरिता हे वाचनालय चालविली जातात का ? असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला, येथील विद्यार्थ्यांना या वाचनालयाचा काहीही फायदा होत नाही, वाचनालय नेहमी बंद असते असेही येथील नागरिकांनी सांगितले, म्हणून विद्यार्थी जिल्ह्याच्या ठिकाणी पैसे खर्च करून जातात, शासनाचे उद्देश पूर्ण होत नाही आणि समाजाला याचा कुठलाही फायदा नाही त्यामुळे शासनाने असे चोरटे वाचनालय बंद करावे, किंवा स्थानिक गावातील नागरिकांना चालविण्यासाठी देण्यात यावे , व आजपर्यंत वाचनालयाच्या चालकांनी जे अनुदानाचा भ्रष्ट्राचार केला तो यांच्याकडून वसूल करावा , अशी मागणी येथील नागरिकानी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top