अमरावती विभागाचे उपायुक्तांची आसेगाव पूर्णा मतदान केंद्रावर भेट

मतदार यादीचा विशेष पूनरीक्षण कार्यक्रमा

अचलपूर (प्रतिनिधी)- भारत निवडणूक आयोगाने दिनांक १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर मतदार यादीचा विशेष पूनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे .या कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी संदर्भात २५ नोव्हेंबर रोजी अजय लहाने उपायुक्त, अमरावती विभाग यांनी अचलपूर विधानसभा मतदार संघातील आसेगाव पूर्णा येथील मतदान केंद्रावर भेट देऊन पुनरिक्षण कार्यक्रमाची पाहणी केली.यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर,तहसिलदार चांदूरबाजार गीतांजली गरड,नायब तहसीलदार अक्षय मांडवे,प्रथमेश मोहोड,मंडल अधिकारी दाते,सरपंच आसेगावं पूर्णा उपस्थित होते.यादरम्यान त्यांनी उपस्थित बीएलओ यांना पुनरिक्षन कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन केले. लोकसभा निवडणूक २०२४ पूर्वीचा हा शेवटचा पुनरिक्षण कार्यक्रम असून जे नागरिक एक जानेवारी २०२४ रोजी अठरा वर्षाचे होणार आहेत त्यांनी मतदार नोंदणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.अचलपूर विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली असून नागरिकांनी आपली नावे मतदार यादीत असल्याची खात्री करून घेण्याचे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अचलपूर श्रीकांत उंबरकर यांनी केले. याकरिता नागरिकांनी आपले क्षेत्रातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे भेट द्यावी.नागरिक www.voters.eci.gov.in या वेबसाईट वरून ऑनलाईन मतदार नोंदणी सुद्धा करू शकतात तसेच वोटर हेल्पलाइन ॲप च्या माध्यमातून सुद्धा मतदार नोंदणी, नाव वगळणी व मतदार यादीतील दुरुस्ती करू शकतात.पूनरिक्षन कार्यक्रमाची अंतिम तारीख ९ डिसेंबर २०२३ आहे.तसेच ३ व ४ डिसेंबर २०२३रोजी सर्व मतदान केंद्रावर मतदार नोंदणीचे विशेष शिबिर होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top