अमरावतीकरांना आता शहराजवळ मिळणार दर्जेदार आणि उत्कृष्ट घरे

अमरावती – आजची वाढती महागाई पाहता, सर्व सामान्य माणसाला अन्न, वस्र या गरज पूर्ण करताना नाकीनऊ येत आहे. आणि यातील तिसरी गरज म्हणजे निवारा हे तर आवाक्या बाहेर गेले आहे. परंतु हे स्वप्न वास्तवात यावे आणि सर्वसामान्य माणसाला स्वतःचे घर सन्मानाने मिळावे असे स्वप्न असणारे शहरातील नव उद्योजक श्री अजिंक्य भेंडे यांनी गोविंदा ग्रुप सोबत यांनी कठोर रेवसा रस्त्यावर २.५ एकर परिसरात प्रशस्त असे रोहाऊस स्कीम “गोकुलम” चे लोकार्पण आयोजित केले आहे. सुप्रसिद्ध बिल्डर म्हणून ओळखल्या जाणारे गोविंद ग्रुप आणि श्री गणेशा प्रॉपर्टीज यांनी अमरावतीकरांसाठी पुन्हा एकदा त्यांच्या स्वप्नांचे घर उभारले आहे. या स्वप्नांच्या घरांचे उद्घाटन रविवार 17 सप्टेंबर रोजी 11 वाजता होणार आहे. शहरातील श्री गणेशा प्रॉपर्टीज अमरावतीकरांसाठी दरवर्षी नव्याने त्यांच्या स्वप्नांचे घर आधुनिक पद्धतीतून उभारतात. त्यामुळेच त्यांची एक नवी ओळख आज शहरात बनलेली आहे. शहरातील कठोरा रोडवरील रेवसा गावाजवळ पोटे कॉलेज येथे श्री गणेशा प्रॉपर्टीजने नव्याने अडीच एकरच्या भव्य लेआउट मध्ये बांधलेल्या कम्युनिटी टाऊनशिपचे आज रविवार 17 सप्टेंबर रोजी भव्य दिव्य उद्घाटन होऊ घातलेले आहे. सदर उद्घाटन समारंभ सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत ठेवण्यात आलेला आहे. या रो हाउसेस मध्ये जॉगीग ट्रॅक, बगीचा, चिमुकल्यांना खेळण्यासाठी व प्रौढांना बसण्यासाठी स्वतंत्र जागा, ओपन जिम, पार्टी हॉल, क्रिकेट साठी मैदान अश्या सर्व सोई उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच या बंगल्यामध्ये G+ 1 डिझाइन स्ट्रक्चरसह 2 बेडरूम, प्रत्येक बंगला शैलीने आणि वास्तुशास्त्रानुसार डिझाइन केलेला आहे. विट्रिफाइड टाइल्स फ्लोअरिंग सुद्धा करण्यात आले आहे. जास्तीत जास्त वापरण्यायोग्य क्षेत्र देण्यात आले आहे. जास्तीत जास्त प्रकाश व मोकळी हवा खेळण्यासाठी जागा ठेवण्यात आली आहे. सुरक्षित द्वार तसेच टाउनशिपभोवती कंपाउंड वॉल ठेवण्यात आली आहे. या उद्घाटन समारंभाला अमरावतीकरांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री गणेशा प्रॉपर्टीज चे संचालक मनोज भेंडे, अजिंक्य भेंडे व अर्जुन भेंडे यांनी केले आहे.