केवायसी करूनही असंख्य शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत

शेतकर्‍याची दिवाळी झाली अंधारात;बँकेत माराव्या लागते चकरा

अचलपूर/वार्ताहर
गेल्या वर्षी २०२१ ते २०२२ मध्ये चांदूरबाजार तालुक्यातील ७ महसूल मंडळमध्ये अतिवृष्टी होवून देखील केवळ आसेगाव पुर्णा आणि तळेगाव मोहना महसूल मंडळ हे अतिवृष्टी मधून वगळण्यात आले होते . यासाठी राज्याचे माजी राज्यमंत्री व अचलपूर मतदार संघाचे आमदार बच्चू कडू यांनी शासन स्तरावर वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याची फलश्रुती म्हणून या दोन्ही मंडळातील १४ हजाराच्या वर शेतकर्‍यांना अनुदान वाटप केले जात आहे. मात्र या ऑनलाईन प्रक्रियेत शेतकर्‍यांना विविध समस्याचे सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे . तळेगाव मोहना येथील शेतकर्‍यांनी गेल्या ४ महिन्यापूर्वी केवायसी केली,अंगठा दिला, तलाठी कडे कागतपत्र सादर करूनही आजही असंख्य शेतकरी अनुदानापासून वंचित असल्याने शेतकरी वर्गात तीर्व रोष व्यक्त होत आहे .यामुळें यंदा शेतकर्‍याची दिवाळी अंधारात झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे .
तालुक्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर २०२१ आणि जानेवारी २०२२ च्या अतिवृष्टी आणि गारपीट चे अनुदानाचे देखील वाटप सुरू आहे . या तालुक्यातील या दोन्ही सर्कल मधील काही गावाची संपूर्ण याद्या येण्यामध्ये विलंब होत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. दुसरीकडे गाव पातळीवरील महसूल विभागाचे तलाठी यांच्या कडून महत्वपूर्ण असलेले सर्व कागतपत्र तसेच केवायसी प्रक्रिया शेतकर्‍यांनी पूर्ण करून ही ३-४ महिने उलटूनही अनुदानाचा लाभ मिळत नसल्याने शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे .एकीकडे वातावरणाचा लहरीपणा आणि पिकाचे झालेले नुकसान मुळे हे अनुदान तरी लवकर मिळणार अशी शेतकरी वर्गात असलेल्या आशेवर पाणी फिरल्याचे चित्र आहे.
तालुक्यात आसेगाव पूर्णा व तळेगाव मोहना या दोन्ही महसूल मंडळाचे २०२१- २२ चे अतिवृष्टी चे अनुदान २४ कोटी ५२ लक्ष रुपये आणि ऑक्टोबर ते डिसेंबर २०२१ व जानेवारी २०२२ चे ७६ कोटी ५५ लक्ष ३५ हजार १२५ रुपये निधीचे वाटप सुरू आहे .मात्र केवायसी गेल्या ३-४ महिन्यापूर्वी करूनही आज शेतकरी अनुदानाची प्रतीक्षा बघत आहे . शेतकर्‍यांनी ऑनलाईन अर्जात बँकेची माहिती भरून सुद्धा आधार कार्ड शी लिंक संबंधीत शेतकरी वर्गाच्या कोणत्या बँकेच्या खात्यात अनुदान जमा होणार? याबाबत ही सभ्रम असल्याने शेतकरी गेल्या ४ महिन्यापासून अनेक वेळी बँकेत जाऊन अनुदान आल्याची माहिती घेत आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top