अकोट येथे भोईराज पुण्यतिथी साजरी

अकोट/प्रतिनिधी
सालाबादप्रमाणे यंदाही दिनांक १७ नोव्हेंबर २०२३ शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता भोईराज भवन भोईपुरा पणज ता आकोट येथे भोईराज कॅलेंडर च्या मुख्य संपादिका सौ. रुख्मिणीताई तायडे व मा. सरपंच सौ. सविताताई तायडे यांनी स्व. किसनराव तायडे यांच्या पुण्यतिथी चे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आकोट उपविभागाचे उपविभागीय अधिकारी श्री. बळवंतराव अरखराव साहेब तर प्रमुख अतिथी म्हणून अंजनगाव सुर्जी च्या तहसीलदार श्रीमती पुष्पाताई दाभेराव, राष्ट्रीय किर्तनकार श्री. शुकदास महाराज गाडेकर, सप्तखंजेरीचे निर्माता सत्यपाल महाराज यांचे शिष्य पवनपाल महाराज, भोई समाज अधिकारी/कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री. महादेवराव वानखडे, उपसरपंच श्रीमती कुसुमताई बोचे ह्या होत्या.उपविभागीय अधिकारी श्री बळवंतराव अरखराव साहेब, अध्यक्ष यांचे स्वागत भोईराज कॅलेंडर निर्माता डॉ रतनलाल तायडे भोई यांनी तसेच तहसीलदार मॅडम चे स्वागत सौ. अश्विनी तायडे यांनी केले. तर शुकदास महाराज यांचे स्वागत मा. तंटामुक्ती अध्यक्ष श्री रामदासभाऊ तायडे यांनी, पवनपाल महाराज यांचे स्वागत डॉ सुरजकुमार तायडे यांनी केले. मान्यवरांनी भोईराज स्व. किसनराव तायडे यांच्या प्रतिमेचे पुजन दीपप्रज्वलन करून सन २००७ पासून संपूर्ण भारतभर मोफत वितरीत करण्यात येणाऱ्या भोईराज कॅलेंडर २०२४ चे लोकार्पण केले. तसेच या वर्षी भोईराज स्व. किसनराव तायडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आधार कार्ड कॅंप, विध्यार्थी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन सुध्दा करण्यात आले होते. संचालन डॉ मयुर तायडे, व्यवस्थापन डॉ दर्शनकुमार तायडे यांनी केले. अध्यक्षांचे परवानगी ने श्री. महादेवराव वानखडे यांनी आभार मानुन कार्यक्रम संपन्न झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top