कार-दुचाकीत धडक;दांम्पत्य ठार

मामा भांजा दर्गा जवळील घटना

सेलू /अभय बेदमोहता-
केळझर येथील दांम्पत्य वर्धेहून केळझर कडे जात असताना पाठीमागून जाणाऱ्या कारने मामा भांजा दर्गा जवळ जोरदार धडक दिली. यात दुचाकी चालक शिक्षक जागीच ठार झाले. तर पत्नी सेवाग्राम रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.
सेवानिवृत्त शिक्षक अवधूत वैरागडे. व पत्नी चित्रा अवधुत वैरागडे असे मृतकांचे नाव आहे, ही घटना बुधवार रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली.
केळझर येथील जिल्हा परिषद सेवानिवृत्त शिक्षक अवधूत वैरागडे व पत्नी चित्रा वैरागडे हे वर्धेला एम एच 32 एफ 9914 ने नातेवाईकांचे लग्न आटोपून केळझर कडे जात असताना मागवून येणाऱ्या कार क्रमांक एम एच 32 ए एस 2502 याने जोरदार धडक दिली. यात अवधूत वैरागडे यांचा जागीच मृत्यू झाला.तर चित्रा वैरागडे गंभीर अवस्थेत सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले असतात्यांना मृत घोषित केले. पुढील तपास सेवाग्राम पोलीस स्टेशनचे पीएसआय संतोष चव्हाण.संदीप मेंढे.विशाल ढेकले करीत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top