गंधारच्या ‘ पद्यस्पर्श ‘ काव्यसंग्रहाचे देवनाथ मठात प्रकाशन

जितेंद्रनाथ महाराजांनी दिला आशीर्वाद

अचलपूर (प्रतिनिधी ):- संपूर्ण विदर्भात नव्हे तर राज्यात साहित्याची वर्षानुवर्षे परंपरा कायम ठेवण्यामध्ये परिचित असलेला अचलपूर शहर आणि ही परंपरा सातत्याने सुरु असुन जुळ्या शहरातील अनेक तरुण साहित्यिक म्हणून समोर येत आहेत. एक नाव म्हणजे गंधार विश्राम कुलकर्णी. नवोदित वक्ता, लेखक, कवी म्हणून गंधार कुलकर्णी पुढे आले आहे.गेल्या २६ नोव्हेंबर रोजी गंधार कुलकर्णी यांचा ‘पद्यस्पर्श’ हा दुसरा काव्यसंग्रह अंजनगाव सूर्जी येथील देवनाथ मठामध्ये प्रकाशित झाला. पुस्तकाचे विमोचन देवनाथ मठाचे पीठाधीश्वर जितेंद्रनाथ महाराज व सौ .माई यांच्या शुभहस्ते झाले. या प्रसंगी कुलकर्णी परिवारासोबत डॉ. नितीन सराफ, प्रकाशक सचिन सुकलकर व प्रिया सुकलकर, पुष्पक भिरंगी उपस्थितीत होते.
२०१९ साली गंधार कुलकर्णी यांचा ‘काव्यतरु’ हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला होता. त्यानंतर गंधारने लिहिलेल्या कवितांचा ‘पद्यस्पर्श’ हा काव्यसंग्रह आहे. त्यानंतर गुरुजी व सौ. माई यांच्या शुभहस्ते ‘पद्यस्पर्श’चे विमोचन झाले. ‘पद्यस्पर्श’चे विमोचन करतांना जितेंद्रनाथ महाराजांनी “गंधारच्या कवितांमध्ये भाव आणि स्पृहण दोन्हींचा समन्वय आहे” असे सांगितले.

यानंतर ‘पद्यस्पर्श’चे प्रकाशक सचिन सुकलकर व प्रिया सुकलकर आणि प्रमुख अतिथी डॉ. नितीन सराफ यांचा जितेंद्रनाथ महाराजांनी सत्कार केला. ‘पद्यस्पर्श’ या काव्यसंग्रहाला जितेंद्रनाथ महाराजांचे आशीर्वचन लाभले आहे. सोबतच ‘पद्यस्पर्श’तील कवितांना साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखिका डॉ. मंजूषा कुलकर्णी यांनी प्रस्तावना दिलेली आहे. साहित्य क्षेत्रातील गंधारची वाटचाल यशस्वी होण्यासाठी ज्येष्ठ कादंबरीकार व समीक्षक डॉ. रवींद्र शोभणे यांनी काव्यसंग्रहाला शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top