मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून लक्षावधी रुपयाच्या निधी

हस्ते फातिमा कॉन्व्हेन्ट ते गुणवंत महाराज मंदीर पर्यंत रस्त्याचे भूमिपूजन

अचलपूर (प्रतिनिधी)- गेल्या अनेक वर्षापासून फातिमा कॉन्व्हेन्ट चा बाजूला असलेल्या मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली होती .या संदर्भात स्थानिक रहिवाशीनी अमरावती जिल्हा परिषद विभागाकडे अनेक तक्रारी करूनही कोणतीही दखल घेण्यात आली नाही.यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने वाहन चालक ,विद्यार्थ्याना अनेक समस्या चां सामना करावा लागला .याबाबत नागरिकांनी प्रहार पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बल्लू जवंजाळ यांच्या कडे ही समस्या मांडली . यानंतर राज्याचे माजी राज्यमंत्री व अचलपूर मतदार संघाचे आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या कडे बल्लूभाऊ जवंजाळ यांनी पाठपुरावा केला.या प्रयत्नाची फलश्रुती म्हणून मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत एमडीआर ८४ ते खेलदेवमाळी पर्यंत रस्त्यासाठी १७९.१२ लक्ष रुपये मंजूर झाले आहे .आज आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.यावेळी प्रहार जनशक्ती पक्षांचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ , देवमाळी ग्राम पंचायत सरपंच पद्माताई सोळंके ,सदस्य बंटी खानझोडे ,कुंदन चव्हाण , सुनीता कळसकर, प्रियंका लायस्कर , प्रतिभा रोंघे, संगीता हरदे ,जयश्री उईके, मंदा भोयार , वैशाली पिहुलकर, साहेबराव पावडे,संजय चापके,प्रशांत आवारे, पेंटर सोनपरोते ,दीपक धुळधर, शहाणे गुरुजी ,गिरीश भोयर ,मुख्यमंत्री ग्राम सडक योजना शाखा अभियंता राहुल जवंजाळ, प्रतीक धोटे,विश्वजित बोंडे आदी उपस्थितीत होते .या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण होणार असल्याने नागरिकांनी आ. बच्चुभाऊ कडू व प्रहार जनशक्ती पक्षांचे बल्लू जवंजाळ यांचे आभार मानले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top