आनंद घैसास यांचे ‘अवकाशातील जीवन’ या विषयावर व्याख्यान

स्व.सोमेश्वर पुसतकर स्मृती व्याख्यानमाला

अमरावती/प्रतिनिधी:- विदर्भाचे सांस्कृतिक राजधानी म्हटल्या जाणार्‍या अमरावती शहरात प्रथमच स्व. दत्तात्रय पुसतकर शिक्षण संस्थेद्वारा संचालित स्व. दत्तात्रय पुसतकर कला महाविद्यालय नांदगाव पेठ यांच्या वतीने स्व. सोमेश्वर पुसतकर स्मृती व्याख्यानमाले अंतर्गत ११ डिसेंबर रोजी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सोमेश्वर पुसतकर सभागृहात होमी भाभा विज्ञान केंद्र मुंबई येथील माजी वैज्ञानिक अधिकारी सुप्रसिध्द् वक्ते, उत्कृष्ट लेखक, चित्रकार, दिग्दर्शक तसेच नाट्य कलाकार आनंद घैसास यांचे ‘अवकाशातील जीवन’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अंतराळ मोहिम आणि अंतराळवीर याबाबत आपल्या सर्वांनाच कमालीची उत्सुकता व कौतुक असते. मात्र अंतराळवीरांचे अवकाशातील आयुष्य कसे असते? त्या ठिकाणी ते जेवतात कसे ?पाणी कसे पितात? ब्रश कसे करतात ?झोपतात कसे? दैनंदिन आयुष्यातील त्यांचा दिनक्रम त्या ठिकाणी कसा पार पडतो ? अंतराळ यांनात दोष निर्माण झाल्यास ते कसे दुरुस्त केल्या जातात ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे आनंद घेसास यांनी व्याख्यानातून व काही स्लाइट्स तसेच काही रंजक वैज्ञानिक व्हिडिओ द्वारे दिली. यावेळी अवकाशातील जीवन आणि अवकाशातील मोहिम या संदर्भातील अनेक महत्त्वपूर्ण बाबी त्यांनी श्रोत्यांना सांगितल्या. अवकाश संबंधी होणार्‍या प्रयोगामध्ये आपल्या भारत देशाचे काय काय योगदान आहे. तसेच इस्रो नी या क्षेत्रामध्ये किती प्रगती केली आहे या बद्दल सुद्धा त्यांनी सांगितले. आपल्या सर्वांना गर्व वाटावा अशी कामगिरी आज भारत करीत आहे. अंतराळामध्ये पाणी शुद्ध करण्याकरिता ज्या मशनरींचा उपयोग केला जातो त्या मशनरीज फक्त भारतामध्ये तयार केला जातात असे सांगितले. सोबतच स्पेस ट्रेनिंग किंवा रिसर्च सेंटरला काम करत असतानाचे बरेच अनुभव त्यांनी यावेळी नमूद केले. अंतराळात गेल्यावर गुरुत्वाकर्षण कस काम करत की नाही अश्या प्रकारच्या अगदी चिमुकल्या प्रश्नांचे सुद्धा त्यांनी सविस्तर उत्तरे दिलीत. त्यामुळे संपूर्ण सभागृह हे मंत्रमुग्ध होऊन गेले होते.याप्रसंगी स्व. दत्तात्रय पुसतकर शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा वृषाली पुसतकर, सचिव श्रीकृष्ण बाळापुरे, व्याख्यानमालेचे समन्वयक अविनाश दुधे आणि स्व. दत्तात्रय पुसतकर कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय दरणे, रेवण पुसदकर विजय दर्डा, बी. टी.देशमुख,प्रदीप देशपांडे,वैभव दलाल यांच्यासह संस्थेचे कर्मचारी, शिक्षक वृंद व मोठ्या प्रमाणात अमरावतीकरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top