योग्य वेळ आल्यावर मनपा प्रशासनाकडून अचूक उत्तर मिळेल- मनपा उपायुक्त डॉ.मेघना वासनकर

शिवसेना समन्वयकांनी केला होता ४० लाखांचा अपव्यवहाराचा आरोप

अमरावती/प्रतिनिधी:- महानगरपालिका मध्ये येणाऱ्या झोननिहाय सफाई कंत्राटातील तब्बल ४० लक्ष रुपयाचा आर्थिक अपहार झाल्याची तक्रार युवा सेनेचे समन्वयक राहुल माटोडे यांनी कोतोली ठाण्यात काही दिवसांपूर्वी दाखल केली होती.यावर आज महानगरपालिकेच्या उपयुक्त डॉ. मेघना वासनकर यांची बाजू विचारली असता त्यांनी सांगितले की,मनपा प्रशासनाकडून तक्रारकर्त्यांना लवकरच योग्य ते उत्तर मिळेल व सत्य बाजू समोर येईल.झालेले आरोप प्रत्यारोप कितपत सत्य आहे ते योग्य वेळी मनपा प्रशासन अमरावतीकरांसमोर सादर करतील अशी माहिती त्यांनी दिली मात्र अन्य प्रश्न त्यांना विचारल्यास त्यांनी नकार दिला.सदर प्रकरणी सविस्तर असे की, अमरावती महानगरपालिका मध्ये येणाऱ्या झोननिहाय सफाई कंत्राटातील तब्बल ४० लक्ष रुपयाचा आर्थिक अपहार झाल्याची तक्रार राहुल माटोडे यांनी कोतवाली ठाण्यात दाखल केली होती.सदर आर्थिक अपहार महानगरपालिकेच्या उपयुक्त डॉ. मेघना वासनकर व आरोग्य विभागातील पि.टी.चव्हाण या दोघांनी मिळून केला असल्याचे त्यांनी आपल्या आरोपात म्हटले होते.या प्रकरणी त्यांनी आपली तक्रार सुद्धा कोतवाली ठाण्यात दाखल केली आहे.काही महिन्यांपूर्वी अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील साफसफाईसाठी एकूण पाच झोन प्रमाणे कंत्राटीची निविदा काढण्यात आली होती.त्यामध्ये विशिष्ट कंत्राटदारांना निविदा मिळावी म्हणून त्यांनी विशिष्ट अटी व शर्ती टाकून नियमबाह्यरीत्या पूर्वीचा कंत्राट संपुष्टात येण्यापूर्वीच म्हणजे पूर्वीचा कंत्राट संपण्याच्या सहा महिने अगोदरच सदर कामाचे कार्याध्यक्ष देण्यात आले होते.सदर काम पाच वर्षाच्या कालावधीसाठी होते. निवेदेप्रमाणे तीन वर्षे जवळपास १२० कोटी रुपयांसाठी सदर निविदा बोलवण्यात आली होती परंतु या कामाचे कार्यादेश देताना सदर काम पाच वर्षाच्या कालावधीसाठी देण्यात आले हे विशेष ज्याची किंमत जवळपास २०० कोटी रुपये आहे.वास्तविक सदर कार्यादेश देण्यापूर्वी शासकीय नियमाप्रमाणे निविदा किमतीच्या कमीत कमी एक टक्का सुरक्षा रक्कम जमा करण्याची तरतूद अमरावती महानगरपालिकेत आहे.यानुसार पाच झोन च्या कंत्राटदारांकडून जवळपास दोन कोटी रुपये मनपाच्या तिजोरीमध्ये सुरक्षा रक्कम म्हणून जमा करणे आवश्यक होते परंतु अशी कोणतीही सुरक्षा ठेव रक्कम सदर कार्यादेश देण्यापूर्वी जमा करण्यात आलेली नाही.या उलट कामाच्या निविदेसोबत भरण्यात आलेली इसारा रक्कम, जी सुरक्षा रकमेचा भाग असते ती जवळपास ४० लाख रुपये कार्यादेश म्हणजेच वर्क ऑर्डर दिल्याच्या दुसऱ्या दिवशी कंत्राटदारांना परस्पर आर्थिक संगनमत करून परत देण्यात आली.याच प्रकरणाबद्दल शिवसेनेचे समन्वयक राहुल माटोडे यांनी महानगरपालिकेच्या उपयुक्त वासनकर व पि.टी.चव्हाण यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.या संपूर्ण प्रकरणावर त्यांची आज बाजू घेताना त्यांनी सांगितले की,सदर प्रकरण लवकरच मनपा अमरावतीकरांच्या समोर आणून सत्य मांडतील व तक्रार करणाऱ्या लोकांना त्यांची उत्तरे मिळतील या प्रकरणाबद्दल अतिरिक्त प्रश्न विचारताच वासनकर यांनी काही बोलण्यासाठी नकार दिला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top