नगरपंचायतींच्या स्वच्छतेसाठी धोरण ठरविणार

अ‍ॅड.ठाकूर यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा

अमरावती-
राज्यातील नगरपंचायती आणि नगरपालिका यांच्या घनकचरा व्यवस्थापनाबाबत आणि स्वच्छतेबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात. याबाबतचे कामे व्यवस्थित रित्या होत नसल्याने त्याबाबतीत सरकारने सर्वकष धोरण ठरवण्याची गरज असल्याची मागणी काँग्रेसच्या ज्येष्ठ आ.अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी विधानसभेत केली. ठाकूर यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सर्वकष धोरण ठरविले जाईल अशी ग्वाही सभागृहात दिली .
नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळ शिवाजी अधिवेशनात चौथ्या दिवशी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान चर्चा करताना अमरावतीच्या काँग्रेस आ.अ‍ॅड.यशोमती ठाकूर यांनी तिवसा नगरपंचायतीच्या व्यवस्थापन आणि स्वच्छतेच्या निमित्ताने सभागृहात प्रश्न उपस्थित केला. राज्यातील अनेक ग्रामपंचायतींची नगरपंचायत अथवा नगरपंचायतींचे रूपांतर नगरपालिकांमध्ये झाल्यानंतर त्यांच्या घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात. घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेची कामे काही उप कंत्राटदारांना दिली जातात. त्यामुळे या कामांवर नियंत्रण आणि नेमका अंकुश ठेवला जात नाही परिणामी अशा नगरपंचायतींच्या स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. तिवसा नगरपंचायतीमध्ये सुद्धा अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण झाला असून यासंदर्भात राज्य सरकारने तिवसा नगरपंचायतीसह राज्यातील सर्वच नगरपंचायतींमध्ये घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेबाबत एक निश्चित धोरण ठरवायला हवे, अशी मागणी सरकारकडे केली.
?ड .ठाकूर यांच्या या मागणीला उत्तर देताना नगर विकास मंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, यासंदर्भात निश्चितच राज्य सरकारकडून सर्वंकष धोरण लवकरच ठरवण्यात येईल. नगरपंचायतींच्या घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेबाबत नेमके काय धोरण ठरवायचे याबाबत नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांना निर्देश दिले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top