वर्षातील सर्वात मोठा जेमिनीड्चा उल्कावर्षाव

अमरावती –
आकाशात १३ व १४ डिसेंबरच्या रात्री ११ वाजतापासून पहाटे ५ वाजेपर्यंत पूर्व दिशेला उल्का वर्षाव होतांना दिसेल. या उल्का वर्षावाला जेमिनीड्चा उल्का वर्षाव असे म्हणतात. हा उल्का वर्षाव लघू ग्रह ३२०० फेथनच्या कचर्‍यापासून तयार होतो. हा उल्का वर्षाव खगोलप्रेमिंना अगदी साध्या डोळ्यांनी रात्रभर पाहता येईल. यात १२० उल्का त्याही रंगीबेरंगी दर तासाला निर्माण होतात. अंधार्‍या रात्री आकाशाचे निरीक्षण करत असताना क्षणार्धात एखादी प्रकाश रेषा चमकून जाताना आपण पाहतो.
या घटनेस तारा तुटला असे म्हटले जाते. परंतु, तारा कधीही तुटत नाही. ही एक खगोलिय घटना असते. याला उल्का वर्षाव असे म्हटले जाते. उल्काचे निरीक्षण आणि त्या निरीक्षणाच्या शास्त्रीय नोंदी याची खगोल जगतात खूप गरज आहे. त्यामुळे बाह्य अवकाशातील वस्तूचे नमुने या उल्केमुळे आपणास मिळतात. यामुळे वस्तूच्या जडण-घडणेचा अर्थ आपणास लावता येतो. धुमकेतू किंवा लघुग्रह सूर्याला प्रदक्षिणा घालून जात असताना त्यातील काही भाग मोकळा होतो.
हे धुमकेतूने किंवा लघुग्रहाने मागे टाकलेले अवशेष होय. या संदर्भात लोकांच्या अंधश्रद्धा खुप आहे. परंतु, अश्या अंधश्रद्धेला खगोलशास्त्रात कुठेही आधार नाही. उल्का वर्षाव रात्री गच्चीवरुन किंवा शहराबाहेर जावून अंधारातून पाहता येईल. सर्व खगोलप्रेमींनी व जिज्ञासूंनी उल्का वर्षावाचे विलोभनीय दृष्य अवश्य बघावे असे आवाहन मराठी विज्ञान परिषद अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top