शिव महापुराण कथेसाठी अमरावतीकरीता परतवाडा बस आगारातून स्वतंत्र २० बसेसची सेवा उपलब्ध

अचलपूर/वार्ताहर
बडनेरा मतदार संघाचे आ.रवी राणा व अमरावती जिल्ह्याचे खा.नवनीत राणा यांच्या नेतृत्वात हनुमान चालीसा चॅरिटेबल ट्रस्ट चा वतीने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक तथा भागवत भूषण पंडित प्रदीप मिश्रा यांची श्री शिव महापुराण कथा अमरावती येथे येत्या १६ डिसेंबर पासून ते २० डिसेंबर पर्यंत छत्री तलाव मार्गावरील हनुमान गढी येथे प्रारंभ होणार आहे. त्या अनुषंगाने अचलपूर तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील भाविक – भक्तासाठी परतवाडा बस आगारातून परतवाडा – अमरावती साठी स्वतंत्र २० बसेस ची सेवा उपलब्ध करण्यात आली असून परतवाडा व अचलपूर या दोन्ही बस स्थानक मधुन बस फेरीची सुविधा उपलब्ध राहणार असल्याची माहिती परतवाडा बस आगार प्रमुख जीवन वानखडे यांनी आमच्या प्रतिनिधिशी बोलताना दिली. परतवाडा बस आगारातून बस फेरीची सुविधा सकाळी ८ वाजतापासून सुरू होणार आहे. तसेच अचलपूर शहरातील बस स्थानक परिसरात सुद्धा भाविक-भक्तासाठी बस फेरीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे . अमरावती येथील दस्तुर नगर पार्किंग यार्ड येथे या बसेसची ये – जा वाहतूक होणार आहे .यामुळे अचलपूर – परतवाडा जुळ्या शहरासह ग्रामीण भागातील भाविक – भक्तासाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top