घरघुती वादातून भाच्याने केली मामाची हत्या

आकोली हेटी येथील घटना

सेलू-
सेलू पोलीस स्टेशन हद्दीतील आकोली हेटी येथे घरघुती वादातून भाच्याने मामाची हत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडली सुधाकर जनार्दन लोहवे वय 45 वर्षे असे मृतक व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार मृतक सुधाकर लोहवे यांची पत्नी काही दिवसांपूर्वी गावातील तरूणा सोबत पळून गेली असता ते दोघेही गावातच वास्तव्यास असल्याची माहिती आहे. यावरून गावातच राहणारा मृतकाचा भाचा संघपाल भोंगाडे याचेशी घटनेच्या दिवशी वादावादी झाली. यात लोखंडी राँडने भाच्याने मामाचे डोक्यावर वार केल्याने मामा जमीनीवर पडला यात अती रक्तस्त्राव झाल्याने मामा सुधाकर लोहवे याचा घटनास्थळी मृत्यू झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेत घटनेचा पंचनामा केला. याप्रकरणी गुन्हा नोंदविला असून आरोपी संघपाल भोंगाडे यास ताब्यात घेतले अधिक तपास सेलू पोलिस करीत आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top