आई वडिलांनी मुलांना संस्कारीत करण्याआधी स्वतः संस्कारीत व्हावे – प.पू. स्वामी जितेंद्रनाथ महाराज

ईसीई मानव सेवा ऊर्जा पुरस्कार २०२३ प.पू. स्वामी जितेंद्रनाथ महाराजांच्या हस्ते प्रदान

अमरावती/प्रतिनिधी- मध्य भारतातील अग्रणी सोलर पॅनल निर्माता कंपनी ईसीई इंडिया एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड चा १४ वा वर्धापन दिवस गेल्या शुक्रवार दिनांक १५ डिसेंबर २०२३ रोजी अमरावती येथील अभियंता भावनात अतिशय जोमात साजरा झाला. या कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथी म्हणून अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ पिठाचे पिठाधीश्वर प.पू. स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांचे आशीर्वचन प्राप्त झाले. सोबतच या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून घरकुल उद्योग समूहाचे संचालक अरुण वरणगावकर आणि विशेष उपस्थिती म्हणून ज्येष्ठ संशोधक व ई सी ई इंडिया फाउंडेशनचे मार्गदर्शक व्ही टी इंगोले सर देखील उपस्थित होते. सोबतच या कार्यक्रमात ई सी ई इंडिया फाउंडेशन चे संस्थापक संचालक अमित आरोकर, सहसंचालक समीर काळे, सचिव अनंत कौलगीकर, सोपांन गोडबोले , मार्गदर्शक उद्योजक संजय जाधव , प्राचार्य डॉ अविनाश मोहरील,आरती प्रकाश आमटे,पल्लवी कडू-म्हाला, उदय पर्वतकर उपस्थित होते. याशिवाय ई सी ई फाउंडेशनचे ट्रस्टी शेखर जोशी आणि स्वप्निल चांदणे देखील उपस्थित होते. याव्यतिरिक्त या कार्यक्रमांमध्ये सामाजिक, औद्योगिक व धार्मिक क्षेत्रातील देखील अनेक विश्वस्त आणि महानुभाव उपस्थित होते.यावेळी स्वामी जितेंद्रनाथ महाराजांचे आशीर्वचन ऐकण्यासाठी सभागृहात जमलेले सर्व जण आतुर होते. प.पू. स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी आपले आशीर्वचन देताना संपूर्ण भारतीय समाजाला प्रबोधन होईल असे उद्गार केले.

महाराजांच्या मते ‘आजची शिक्षा व्यक्तीला परमार्थाकडे नव्हे तर स्वार्थाकडे वळवते आहे. म्हणून मातापित्यांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी लौकिक शिक्षणाच्या व्यतिरिक्त आपल्या मुलांना धार्मिक रित्या सुसंस्कारित करणे अत्यंत आवश्यक आहे. लौकिक शिक्षणासोबतच आपल्या पाल्यांना अधिकाधिक सुसंस्कारित करणे, त्यांच्यात धार्मिक, सामाजिक, राष्ट्रीय व माणुसकीच्या जाणिवा वृद्धिंगत करणे आणि त्यांच्यात भारतीयत्व रुजेल यासाठी सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी पालकांनी अगोदर स्वतः सुसंस्कृत होण्याची गरज असल्याचे देवनाथ पिठाचे पीठाधिश प.पु.आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांनी सांगितले.ई सी ई इंडिया फाउंडेशन तर्फे आयोजित हा ई सी ई इंडिया एनर्जीस प्रायव्हेट लिमिटेड चा १४ वा वर्धापन दिन प्रामुख्याने मानव सेवा ऊर्जा पुरस्कार व सेवा ऊर्जा पुरस्कार प्रदान करण्यासाठी देखील ओळखल्या जातो. या शुभप्रसंगी ई सी ई इंडिया फाउंडेशन तर्फे अशा दैवीय व्यक्तीत्वाचा सत्कार केल्या जातं ज्याला खर्‍या अर्थाने समाजाच्या उत्तरदायित्वाची जाणीव झालेली आहे, जो व्यक्ती समाज व देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करून मानवतेची पूजा करतो आहे आणि जो व्यक्ती निस्वार्थ भावनेने मानव सेवा हीच ईश्वर सेवा समजून आपले आयुष्य ओवाळून टाकतो अशा दुर्लभ व्यक्तीत्वांचं सत्कार करून त्याला हे ईसीई मानव सेवा ऊर्जा पुरस्कार देण्यात येते. यावर्षी ई सी ई इंडिया फाउंडेशन तर्फे ई सी ई मानव सेवा ऊर्जा पुरस्कार २०२३ हे यवतमाळ जिल्ह्यात आर्णी तालुक्यातील मातोवृद्धाश्रमाचे संचालक खुशाल नागपुरे यांना देण्यात आले. खुशाल भाऊ नागपुरे गेल्या आठ वर्षांपासून सतत वृद्ध माता-पित्यांची व अनाथ दिव्यांग लोकांची निस्वार्थ सेवा करत आहेत. ई सी ई इंडिया एनर्जीच्या या वर्धापन दिन कार्यक्रमात खुशाल नागपुरे आपल्या पत्नी सौ अरुणा खुशाल नागपुरे सह उपस्थित होते आणि यावेळी खुशाल नागपुरे यांना ई सी ई मानव सेवा ऊर्जा पुरस्कार २०२३ प.पू. स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या पुरस्कारामध्ये प्रामुख्याने खुशाल नागपुरे यांना ५१ हजार रुपये, मानचिन्ह, मानपत्र आणि शाल श्रीफळ देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले.

याप्रसंगी कृतज्ञता व्यक्त करताना खुशाल नागपुरे भावुक झाले आणि त्यांनी ई सी ई इंडिया फाउंडेशन चे आभार व्यक्त केले. याप्रसंगी खुशाल भाऊ नागपुरे यांना मानव सेवा ऊर्जा पुरस्कार प्रदान केल्यानंतर परमपूजनीय स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी खुशाल भाऊ नागपुरे यांबद्दल म्हटले की ‘मानवी सेवेचा आपल्या आईला दिलेला शब्द प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी अपार कष्ट घेऊन खर्‍या अर्थाने वृद्ध,अपंग व निराधारांची सेवा शुश्रूषा करणारे मातोवृद्धाश्रमाचे संचालक योगेश नागपूरे व त्यांच्या पत्नी सौ अरुणाताई हे खर्‍या अर्थाने दैवी दाम्पत्य आहे. त्यांनाच परमार्थ व ईश्वर समजला आहे. लौकिक शिक्षणापेक्षा कितीतरी मोठे व उच्च शिक्षण त्यांनी या सेवेतून प्राप्त केले आहे. त्यांच्या या मानवीसेवा कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कृत व सन्मानित करण्याची संधी मला मिळावी हा माझे सदभाग्य आहे, अशा शब्दात त्यांनी खुशाल नागपुरे यांचा गौरव केला’. याप्रसंगी खुशाल भाऊ नागपुरे यांना यवतमाळ येथील दर्डा ट्रस्ट तर्फे देखील ५१ हजार रुपयांचे चेक सुपूर्द करण्यात आले. हे चेक देण्यासाठी विशेष पणे यवतमाळ येथील दर्डा ट्रस्टचे कार्यकारी सुरेश राठी व दीपक बागडी उपस्थित होते.

यावेळी ई सी ई कंपनीचे संचालक अनिकेत तोंडारे, श्रीकांत तिखीले, सूरज गावंडे व शहरातील अनेक गणमान्य व्यक्ती उपस्थित होते. ई सी ई इंडिया एनर्जीच्या या चौदाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात कंपनीतील उत्कृष्ट कामगिरी दर्शवणार्‍या सहकर्मिना आणि त्यांचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी सेवा ऊर्जा पुरस्कार देखील देण्यात आले. यामध्ये कंपनीतील सर्वोत्तम सेवा ऊर्जा पुरस्कार नीलम ठाकरे , सर्वोत्तम नव ऊर्जा पुरस्कार सूरज कचवे ,सर्वोत्तम प्रबंधक प्रमोद दहिया आणि सर्वोत्तम विभाग मानव संसाधन विभागाला देण्यात आला. याव्यतिरिक्त या कार्यक्रमाच्या दुसर्‍या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आला, ज्यामध्ये पर्यावरण विषयक फॅन्सी ड्रेस, सांस्कृतिक गीतांवर डान्स आणि गायन कलेचे सादरीकरण सामील होते. या सर्व उपक्रमांमध्ये कंपनीतील सर्व सहकारणींनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला व पुरस्कारही पटकावले. एकंदरीत या कार्यक्रमांमध्ये कंपनीतील सर्व सहकारी मंडळी आपल्या कुटुंबीयांसह सहभाग घेतला व कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे संचालन प्राजक्ता राऊत ,रोहित यादव आणि आभार प्रदर्शन निकिता गावंडे यांनी केले.

2 thoughts on “आई वडिलांनी मुलांना संस्कारीत करण्याआधी स्वतः संस्कारीत व्हावे – प.पू. स्वामी जितेंद्रनाथ महाराज”

  1. राजा धर्माधिकारी संचालक जागृती व्यसनमुक्ती केंद्र

    इतका सुंदर उपक्रम आहे की समाजातले अनेक व्यक्ती या पासून प्रेरणा घेऊन मानवसेवेत नक्कीच समर्पित होतील खूप सुन्दर आणि प्रेरक बातमी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top