महाराष्ट्रातील बेरोजगारांना महिन्याला ३००० रुपयांचा भत्ता द्या

छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासिकेचे अध्यक्ष ललित प्रभाकर नगराळे यांची मागणी

अकोट – केंद्र व राज्य सरकार नोकऱ्यांच्या घोषणा करतात.मोजक्याचं जागा निघतात त्यामध्ये लाखो उमेदवार अर्ज करतात.मात्र बेरोजगार तरुण,तरुणींचा प्रश्न कायम राहतो.दिवसेंदिवस बेरोजगार तरुण,तरुणींची संख्या झपाट्याने वाढत आहे.युपीएससी, एमपीएससी,बॅंक,रेल्वे,पोलिस,आरोग्य भरती या क्षेत्रातील परीक्षांसह केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये नोकर भरती केली जाते.त्यामध्ये १८ ते ३५ वयोगटातील तरुण,तरुणींची संख्या ही मोठी आहे.त्यामुळे त्यांना जीवन जगण्यासाठी रोजगार मिळावा यासाठी ते धडपड करीत असतात.त्यामुळे छत्तीसगडमध्ये बेरोजगार तरुणांना महिन्याला २५०० रुपयांचा भत्ता मिळणार आहे.अशी घोषणा छत्तीसगड मध्ये केली असून याच धरतीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रातील १८ ते ३५ वयोगटातील बेरोजगार तरुण,तरुणींना महिन्याला ३००० रुपयांचा भत्ता देण्याची घोषणा हिवाळी अधिवेशनात करावी.महाराष्ट्रासह संपूर्ण विदर्भात बेरोजगारी हा चिंतेचा विषय आहे.बेरोजगारी ही पदोपदी तरुण,तरुणींना भेडसवणारा प्रश्न आहे.स्पर्धा परीक्षेची फी भरण्यासाठी देखील तरुणांकडे पैशाची चणचण भासत आहे.त्यामुळे सरकारनेच आता तरुणांना ३००० रुपये बेरोजगार भत्ता जाहीर करावा.अशी मागणी अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील आकोलखेड येथील छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासिकेचे संस्थापक अध्यक्ष ललित प्रभाकर नगराळे यांनी केली आहे.

“स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी,विद्यार्थिनी यांचा बेरोजगारीचा दर वाढता आहे.त्यादृष्टीने सरकारने ३००० रुपये बेरोजगार भत्ता जाहीर करावा”.

– ललित प्रभाकर नगराळे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासिका

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top