समाज क्रांती आघाडीचा २० डिसेंबर ला अधिवेशनावर मोर्चा – ॲड.श्रीकृष्ण टोबरे

अकोट :
सामान्यांच्या घटनादत्त अधिकाराची लढाई समाज क्रांती आघाडी चे संस्थापक अध्यक्ष,भारतीय राज्य घटनेचे गाढे अभ्यासक, संविधानाचे रक्षणकर्ते प्रा.ॲड.मुकुंद खैरे यांचा संघर्ष डोळ्यांच्या पटलावरून पुढे जात असतांना अभ्यासू,निर्भीड, निडर,निपक्ष,लढाऊ,निधड्या छातीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असणारा त्यागी, वामनदादा कर्डक यांच्या म्हणण्या नुसार भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते. तलवारीचे तयाला न्यारेच टोक असते.तर त्यातील एक भीमाच्या खऱ्या वैचारिक वारसदाराच्या संघर्षमय तालमीत ताऊन सुलाखून निघालेलं अभ्यासू नेतृत्व हंसराज शेंडे समाज क्रांती आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष,भारतीय राज्य घटनेचे अभ्यासक यांच्या नेतृत्वात हिवाळी अधिवेशनावर येत्या ता.२० डिसेंबर ला दुपारी १२ वाजता मोर्चाचा प्रारंभ दीक्षाभूमी नागपूर येथून होणार समाज क्रांती आघाडी च्या माध्यमातून आपले अभ्यासू नेतृत्व या गेंड्याच्या कातळीच्या सरकारला धारेवर धरण्या साठी येत आहेत करिता आपले हक्क व आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी या धडक मोर्चात सामील व्हावे असे आवाहन समाज क्रांती आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ॲड.श्रीकृष्ण टोबरे यांनी केले.मोर्चातील प्रमुख मागण्या ईव्हीएम.हटाव देश बचाव,लोकशाही बचाव सरकारने केलेल्या जगीकरणाचे सार्वजनिकरण सरकारी करा. जमीन नसेल त्याला जमिनीचे पट्टे द्या.जमिनीवरील अतिक्रमण धारकांना २०२३ पर्यंतचे मालकी पट्टे द्या. जातीनिहाय जनगणना करा. एन,टी,बी.ला आठ टक्के व स्लिमांना ५ टक्के आरक्षण द्या.नियमानुसार सर्वच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा.शेतकरी शेतमजूर, कष्टकरी, ज्या नागरिकांचे वय ६० वर्ष झाली त्या सर्वांना रुपये २५,००० दरमहा पेन्शन द्या.शिक्षणाचे खाजगीकरण थांबवा,शाळा बंद चे परिपत्रक रद्द रा.बेरोजगारांना रोजगार द्या,नोकर भरती करा.शेतकऱ्यांचे सर्व कर्ज २०२३ पर्यंतचे माफ करा.सैन्य भरती जुन्याच पद्धतीने करा, अग्निवीर भरती बंद करा. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्‍टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्या. आमदार खासदारांचे पेन्शन बंद करा.ह्या मागण्यांना घेऊन समाज क्रांती आघाडी धडक मोर्चाच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनावर मोर्चा जाणार असल्याचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष ॲड.श्रीकृष्ण टोबरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.यावेळी राज्य उपाध्यक्ष बंडूदादा वानखडे,अकोला जिल्हाध्यक्ष दिगंबर पिंप्राळे, डॉ.प्रभाकर नगराळे आदी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top