आयुषमान कार्ड व रोगनिदान शिबीर

दर्यापूर/वार्ताहर
अंजनगाव सुरजी तालुक्यात ग्रामीण भागात सातेगाव येथे खा.अनिल बोंडे जिल्हाध्यक्ष अमरावती ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी व स्व माजी आ.किसनराव खंडारे बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आयुष्मान भारत संयोजक अमरावती जिल्हा भाजपा अ‍ॅड. भूषण खंडारे यांच्या वतीने भारत मातेची पूजन करून आयुषमान कार्ड व रोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी १५० लोकांनी आयुष्मान कार्ड काढून देण्यात आले. रोगनिदानन तपासणीकरिता दर्यापूर येथील सुप्रसिद्ध एकता मल्टी स्पेशलिस्ट आयुष्यमान महात्मा फुले योजना धारक हॉस्पिटल येथील डॉ.इकबाल पठाण, डॉ अस्पीया पठाण, अस्थिरोग तज्ञ डॉ शामसुंदर वर्मा, नेत्र तपासणीकरिता परतवाडा येथील डॉ महेंद्र संगोळे यांनी उपस्थिती दर्शवून लोकांचे रोग निदान केले. तसेच त्यांना शस्त्रक्रिया मार्गदर्शन दिले. तरी याप्रसंगी उपस्थित भारतीय जनता पार्टी पदाधिकारी या नात्याने भारतीय जनता पार्टी जिल्हा सचिव नंदकिशोरजी काळे, उपसरपंच पुरुषोत्तम काळे भारतीय जनता पार्टी आयुष्मान भारत जिल्हा संयोजक अ‍ॅड.भूषण खंडारे उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top