विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षेमध्ये प्रबोधन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

दर्यापूर/प्रतिनिधी
ISRO, VIBHA, NCERT, NCSM द्वारे आयोजित विद्यार्थी विज्ञान मंथन 2023 (VVM) परीक्षेमध्ये प्रबोधनच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. वर्ग 9 मधून वैष्णवी सुरेश शेकोकार, तालुक्यात प्रथम. वर्ग 10 मध्ये तालुक्यातील प्रथम- द्वितीय- तृतीय तिन्ही क्रमांक प्रबोधन विद्यालयाला प्राप्त झाले. अनुक्रमे विद्यार्थी प्रथम मंथन देवेन शहा द्वितीय भाविका दीपक पारवे तृतीय कु. नंदिनी सुधीर इंगोले. वर्ग 11 मधून स्नेहा किशोर तुपसुंदर तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात द्वितीय. या परीक्षेमध्ये विद्यालयातून एकूण 38 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व तालुका- जिल्हास्तर घवघवीत यश प्राप्त केले. प्रबोधन विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय रेवस्कर ,उपमुख्याध्यापिका कु. भिसे , उपप्राचार्य गोंडाने , पर्यवेक्षक द्वय संत व बावनकुळे व सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन विज्ञान शिक्षक मनोज राठी व हरीश माहुरे यांनी केले.
या यशानंतर इसरो द्वारे दोन दिवसीय सायन्स बस साठी प्रबोधन विद्यालयाची निवड केलेली आहे. लवकरच विज्ञान प्रेमी शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी दोन दिवस विज्ञान बस प्रबोधन विद्यालय दर्यापूर येथे येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top