नववर्षाची पहिली रात्र `त्यांच्या’साठी काळरात्र ठरली

दोन दुचाकीच्या धडकेत चौघांचा जागीच मृत्यु;दोघे गंभीर

 चांदूरबाजार-    नववर्षाची सुरवात चांदूरबाजारात अपघाताने झाली.नववर्षाच्या पहिल्याच रात्री  दोन दुचाकीत जबर धडक झाल्यामुळे चार जण जागीच ठार झाले तर दुचाकीच्या मागे बसलेले दोघे गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आहे.सदरची घटना १ जाने.ला रात्री ९ ते ९.३० चे सुमारास चांदूरबाजार – अमरावती रोडवर निसर्ग बार समोरच्या रोडवर घडली.सौरभ किशोर मसराम २२ मासोद (अमरावती),शे.जुनेद शे.बिसमिल्लाखान २१ ताजनगर चांदूरबाजार,गोलु उर्फ धिरज टवलारे २० शेवती (नांदगाव पेठ) शे.नसीम शे.हसन ४० ताजनगर चांदूरबाजार अशी मृतकांची नावे असून शे.नजीर शे.हसन ५५ पिंफळपुरा चांदूरबाजार व रविंद्र मसराम २० मासोद (अमरावती) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.

     सौरभ मसराम हा आपली होंडा दुचाकी क्र.२७ बीजे ४१५४ वर बहिरमवरुन अमरावती मार्गाने मामोद येथे ट्रिपल शीट जात होते.तर शे.जुनेद शे.बिसमिल्ला हे आपल्या पल्सर दुचाकी क्र.एमएच २७ डीजी ९७०१ वरुन लग्न स्वागत सभारंभातून अमरावतीवरुन   चांदूरबाजारकडे ट्रिपल शीट येत होते.चांदूरबाजार वरुन दोन कि.मी.वर असलेल्या निसर्ग बार समोर दोन्ही दुचाकींची अमोरासमोर जबर धडक झाली.धडक इतकी जबर होती की दोन्ही दुचाकीचालक सौरभ व जुनेद सह सौरभचे मागे बसलेला गोलु व जुनेदचे दुचाकीवरील शे. नसीम जागीच ठार झाले तर जुनेदचे दुचाकीवरील  शे.नजीर व सौरभचे दुचाकीवरील रविंद्र मसराम हे दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

  घटनेची माहीती मिळताच चांदूरबाजार पोलीस स्टेशनचे सहाय्यक ठाणेदार निखिल निर्मळ आपल्या सहकार्यासह घटनास्थळावर पोहोचले तर अचलपुर उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल नवगीरे यांनीही घटनास्थळ गाठून घटनास्थळावरील लोकांच्या सहकार्याने जखमींना तातडीने अमरावती जिल्हा रुग्णालयात दाखल केले.या प्रकरणात दोन्ही मृतक दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक्षक विशाल आनंद,एसडीपीओ अतुल नवगीरे,ठाणेदार सुरज बोंडे यांच्या मार्गदर्शनात एपीआय निखिल निर्मळ,एपीआय प्रमोद राऊत,सारीका राऊत,एएसआय विनोद इंगळे,हे.काँ दिलीप मुळे,विजय आगळे,प्रशांत निंभोरकरआशिष इंगळे,गौरव पुसदकर पुढील तपास करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top