पेट्रोल – डिझेल भरण्यासाठी जुळ्या शहरातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या लांब रांगा

संपामुळे झाला परिणाम…

अचलपूर /प्रतिनिधी- केंद्र सरकारने भारतीय न्यायिक संहिता २०२३ मध्ये सुधारणा केल्यानंतर नवीन मोटार वाहन कायद्यानुसार अपघातास जबाबदार असलेल्या ट्रकचालकास १० वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.देशात लागू करण्यात आलेल्या नवीन हिट अँड रन कायद्याच्या विरोधात वाहतूकदार आणि ट्रकचालक संपावर गेले आहेत. त्यामुळे अचलपूर – परतवाडा जुळ्या शहरातील पेट्रोल पंप बंद असतील म्हणून पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवडा निर्माण होऊ शकतो अशा बातम्या मिळत आहेत. त्यामुळे वाहनचालक पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर मोठ्या संख्येने येताना दिसत आहे. त्यामुळे जुळ्या शहरातील पेट्रोल पंपावर गर्दी दिसून येत आहे.
केंद्र सरकारने भारतीय न्यायिक संहिता २०२३ मध्ये सुधारणा केल्यानंतर नवीन मोटार वाहन कायद्यानुसार अपघातास जबाबदार असलेल्या ट्रकचालकास १० वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय ७ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात येणार आहे. दरम्यान, या कायद्याचा देशभरातून निषेध होत असून ट्रक आणि टँकर चालकांनी थेट संप पुकारला आहे. अशा परिस्थितीत बीपीसीएल, एचपीसीएल आणि इंडियन ऑईल या तीन कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा करणाऱ्या टँकर चालकांनीही हा नवा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी तीन दिवसांचा संप पुकारला आहे.ज्यामध्ये टँकर चालक १ ते ३ जानेवारी दरम्यान संपावर गेले. त्यामुळे पंप बंद राहण्याच्या भीतीपोटी वाहनधारक पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी जुळ्या शहरातील विविध पंपांवर रांगा लावत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top