पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला एका स्वाभिमानी पत्रकारास मारहाण

अमरावती मधील घटना; आरोपी अटक

अमरावती/प्रतिनिधी
पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला अमरावती शहरातील जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयात वृत्त संकलन करण्याकरिता गेलेल्या युवा पत्रकारास तेथील वराह च्या मालकाने जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना दुपारी उघडकीस आली. या घटनेचा अमरावती शहरातील संपूर्ण पत्रकारांनी तीव्र निषेध व्यक्त केला असून पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशावरून संबंधित आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई गाडगे नगर पोलिसांनी केली असून आरोपीवर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सदर घटनेबाबत सविस्तर असे की, अमर घटारे वय 34 असे मारहाण करण्यात आलेल्या युवा पत्रकाराचे नाव आहे.अमर घटारे यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने अमर हे महाराष्ट्रातील एका लोकप्रिय वृत्तवाहिनी मध्ये जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे. ते आपल्या वृत्तवाहिनी करिता एक मोठी स्टोरी करण्याकरिता शहरातील जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयात गेले होते येथील अस्वच्छतेचा जो पहाड तयार झालेला आहे. त्याबाबत व अन्य काही वृत्त संकलन करण्याकरिता ते गेले होते दरम्यान येथील परिसरात मोठ्या प्रमाणात वराह आहेत. या वराहांचा वावर चक्क रुग्णालयात सुद्धा होतो मात्र. त्याकडे येथील साफसफाई कामगार व रुग्णालय प्रशासन काहीच लक्ष देत नाहीत. ज्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात रोगराई सुद्धा पसरली आहे. याचेच वृत्त संकलन करण्याकरिता अमर घटारे गेले असता येथील वराहाच्या मालकांनी त्यांना अडविले इतकेच नव्हे तर त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून ५ ते ६ युवकांनी त्यांना लोखंडी रॉड ने चक्क मारहाण सुद्धा केली.

सदरची माहिती पत्रकारांना प्राप्त होताच या घटनेचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला. पोलीस आयुक्तांना सुद्धा आरोपीला अटक करण्याची विनंती शहरातील वरिष्ठ पत्रकारांनी केली असता पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या आदेशावरून गाडगे नगर पोलिसांनी तात्काळ संबंधित आरोपीस अटक केली आहे सिद्धू पळसपगार असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याचे चार ते पाच सहकारी अद्याप फरार आहे त्यांचा शोध पोलीस घेत आहेत आरोपीवर पोलिसांनी कलम पत्रकार संरक्षण कायदा 393, 392, 353, 186, 323, 394 व 506 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top