नरसाळा शेतशिवारात महिलेची हत्या

परतवाडा पोलीसांनी आरोपीला केली तात्काळ अटक

अचलपुर/प्रतिनिधी –

परतवाडा – धारणी मार्गावरील परतवाडा शहरा लगत च्या नरसाळा शेत शिवारात एका महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार , परतवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत येनाऱ्या गौरखेडा (कुंभी ) येथील अजय जाधव याने राजू गोयल यांचे लागवण ने शेत केले आहे.धारणी मार्गावरील गौरखेडा गावाजवळील नरसाळा शेत शिवारातील शेतात मुन्ना भैय्यालाल बारस्कर वय ३३ रखवालदार ठेवला होता .त्याने शेतमालकाला आपली पत्नी म्हणुन मृतक अनिता असल्याचे सांगितले . मृतक अनिता पानसे वय – ४० व ही आरोपी सोबत दि.६ जानेवारीला ला मध्यरात्री दारू पिल्यानंतर मुन्ना व अनिता या दोघांत किरकोळ कारणावरून वाद झाला .यात आरोपी मुन्ना बारस्कर याने रागाच्या भरात मृतक अनिता पानसे हिला काठीने मारहाण करुन गंभिर दुखापत करून जीवानिशी ठार केले असल्याचे फिर्यादी अजय जाधव यांनी दिलेल्या तक्रारीत नमुद आहे.परतवाडा पोलिसानी प्राथमीक चौकशी केली असता . सदर आरोपी व मृतक हे पती पत्नी नसुन ते सोबत रिलेशन शिप मधे राहत असल्याची माहिती समोर आली आहे . आरोपी मुन्ना बारस्कर वय – ३३ याला अटक करण्यात आली असुन परतवाडा पोलीस स्टेशन चे ठाणेदार संदीप चव्हान यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास परतवाडा पोलीस करीत आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top