बिबट्याच्या कातडीचे तस्करी करणारे गजाआड

नागपूर व परतवाडा वनविभागाची मोठी कारवाई

अचलपूर /प्रतिनिधी
राजस्व आसूचना निर्देशालय नागपूर येथील पथक व परतवाडा वनविभाग यांच्या संयुक्त कारवाई ने अरुणोदय लॉज वर काही व्यक्ती बिबट्याच्या कातडीची तस्करी करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली .या नुसार संयुक्त कारवाई करीत रचलेल्या सापळ्यात चार आरोपीसह बिबट्याची कातडी व एक चारचाकी वाहन क्रमांक OR.09.M-3739 जप्त केले आहे. या संदर्भात आरोपीविरुद्ध वनगुन्हा क्रमांक ००१७७/०४४१६ नुसार वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार वनगुन्हा नोंदविण्यात आला आहे.या कारवाई मध्ये अमरावती प्रादेशिक वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक ज्योती बॅनर्जी, वनसंरक्षक अमित मिश्रा यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सहायक वनसंरक्षक प्रशांत भुजाडे, परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकारी दिनेश वाळके करीत आहे . या कारवाई मध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी दिनेश वाळके, वनपाल प्रशांत उमक, वनरक्षक पी. आर. अलोकार व ईतर वनकर्मचारी यांचा सहभाग होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top