नागपूरच्या इग्नू रिजनल सेंटरच्या विद्यार्थ्यांनी पटकावला फिरता चषक

स्व. माणिकराव घवळे स्मृती राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा

रितेश तिवारी,सौरभ गुळदे, अनिरिद्ध तळेगावकर पुरस्काराचे मानकरी

अमरावती/प्रतिनिधी

   डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित स्व.माणिकराव घवळे स्मृती राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचा फिरत चषक यावर्षी नागपूर येथील इग्नू

रिजनल सेंटरच्या चमू ने पटकावला.वैयक्तिक गटात नागपूर येथील रितेश तिवारी याने प्रथम तर सौरभ गुळदे अमरावती, आशुतोष तळेगावकर पुरस्काराचे मानकरी ठरले.
डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय, अमरावती व स्व. माणिकराव घवळे स्मृती प्रतिष्ठान च्या वतीने आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन दिनांक 4 जानेवारी रोजी करण्यात आले होते. स्पर्धेचे हे 22 वे वर्षे होते. स्पर्धेत धुळे, नाशिक, पुणे, गडचिरोली, नागपूर, बुलडाणासह विविध जिल्ह्यातील 50 स्पर्धक सहभागी झाले होते.”आर्थिक निकषावरील आरक्षण देश हिताचे आहे “या विषयावर स्पर्धकांमध्ये जोरदार वैचारीक दंगल रंगली.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला अध्यक्ष म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. गजानन पुंडकर तर मुख्य अतिथी म्हणून विदर्भ युथ वेल्फेयर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे हे उपस्थित होते.यावेळी प्राचार्य डॉ.वर्षा देशमुख, संयोजक प्रफुल घवळे, वैशाली घवळे (गरकल) व स्पर्धेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.प्रकाश दाभाडे व्यासपिठावर उपस्थित होते. स्पर्धेकरिता परीक्षक म्ह्णून कोल्हापूर येथील उमेश सुतार, धाराशिव येथील प्रशांत गुरव, घाटंजी येथील रुपेश कावलकर यांनी काम पाहिले यावेळी परिक्षकांसह अतिथींनी मनोगत व्यक्त करून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
वादविवाद स्पर्धेत जोरदार युक्तिवाद करताना स्पर्धकांत चुरस पहायला मिळाली. स्पर्धेत सांघिक विजेतेपद इग्नू रिजनल सेंटर नागपूर च्या रितेश तिवारी आणि आशुतोष तिवारी यांच्या संघाने पटकावले. वैयक्तिक प्रथम पुरस्कार रोख ११,००१ रू, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र रितेश तिवारी , नागपूर याने तर व्दितीय पुरस्कार रोख ७००१ , स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र सौरभ गुळदे, डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय अमरावती, तृतीय पुरस्कार रोख ५००१, स्मृती चिन्ह प्रमाणपत्र अनिरुध्द तळेगांवकर लोकप्रशासन विभाग, नागपुर विद्यापीठ, विशेष उत्तेजनार्थ पुरस्कार आशुतोष इंगळे व करण पारेख यांनी पटकावले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व विजयी स्पर्धकांचे अभिनंदन करून त्यांना पारितोषिक देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर चौधरी यांनी केले तर आभार वैशाली गरकल यांनी मानले.स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संजय बनारसे, भीम बारसे, मंगेश तायडे, प्रा. अमित गावंडे, प्रा.शीतल तायडे, प्रा. रत्नाकर शिरसाठ, रणजित देशमुख, विजय देशमुख, प्रवीण गावंडे, प्रसाद पांडे, गौरव देशमुख आदींनी परिश्रम घेतले.

वादविवाद स्पर्धा, वैचारिक मंथनाचे व्यासपीठ-डॉ. नितीन धांडे

प्रत्येकाच्या अंगी वक्तृत्व कला ही नैसर्गिकच आहे.फक्त त्याचा योग्यवेळी वापर करता आला पाहिजे.अश्या स्पर्धांमधून कला कौशल्याचा विकास होतो. कलेमुळे जग जिंकता येते.वादविवादातून वैचारिक मंथन होत असल्याने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत आहे त्यामुळे अश्या वादविवाद स्पर्धांची गरज असल्याचे मत विदर्भ युथ वेलफेयर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी व्यक्त केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top