भरधाव अर्टिगा २०० फूट दरीत कोसळली, चिखलदऱ्यात भीषण अपघात; चौघांचा जागीच अंत

अमरावती : अमरावती चिखलदरा मार्गावर आज पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. या अपघातात अर्टिगा गाडी थेट २०० फूट खाली पडल्याने घटनास्थळी काही लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आठ पैकी चार लोकांचा घटनास्थळीच मृत्यू झालेला आहे. सर्व व्यक्ती हे आदीलाबाद येथील रहिवासी असून ते पर्यटनासाठी चिखलदरा येथे आले असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या चिखलदारा पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास सुरु आहे. या अपघातात अर्टिगा वाहन क्रमांक एपी २८ डीडब्ल्यू २११९ या गाडीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top