
नवी दिल्ली-
C-295 भारतीय वायुदलाच्या पहिल्या सी-295 मालवाहू विमानाने शनिवारी स्पेन येथून भारताच्या दिशेने उड्डाण केले आहे. ग्रूप कॅप्टन पी. एस. नेगी या विमानाचे वैमानिक आहेत. पुढील काही दिवसांत 6.854 किमीचा प्रवास करून ते भारतात दाखल होण्यापूर्वी माल्टा, इजिप्त आणि बहरीन येथे ते थांबे घेणार आहे. वायुदल प्रमुख विवेक राम चौधरी यांना 13 सप्टेंबर रोजी हे विमान सोपवण्यात आले होते.
हे विमान केवळ भारतीय वायुदलासाठीच नव्हे, तर देशासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. यामुळे देशाची सामरिक क्षमता वाढणार आहे. सोबतच ते आत्मनिर्भर भारताची ओळखही ठरणार आहे. C-295 यातील 16 विमाने स्पेनमध्ये तयार होणार आहेत. 56 सी-295 विमानांच्या पुरवठ्यासाठी भारताने सप्टेंबर 2021 मध्ये एअरबससोबत करार केला होता. या करारानुसार बडोदा येथील वायुतळावर एअरबससोबत टाटा अॅडव्हान्स सिस्टिम लि.द्वारे स्थापन केल्या जाणार्या प्रकल्पात 40 विमानांचे उत्पादन घेतले जाणार आहे. एअरबसच्या स्पेन येथील प्रकल्पातून उड्डाणास सज्ज असलेली 16 विमाने मिळणार आहेत.