विहिरीतील उपोषणाने प्रशासन हादरले

सोनोरी येथील प्रंलंबित अतिक्रमण हटविले
पोलीस,प.स.ग्रामपंचायत सदस्य,सचिवांची उपस्थिती

चांदूरबाजार-
सोनोरी येथील विलास चर्जन यांनी वार्ड नं. १ सोनोरी येथील ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी दि. ११ सप्टेंबर पासून, ग्राम पंचायत प्रशासना विरोधात ४५ फुट खोलवर असलेल्या कोरड्या सार्वजनिक विहिरीत खाट टाकुन आमरण उपोषन सुरू केले होते. याची दखल मीडियाने घेतल्याने प्रशासन हादरले. उपोषणाच्या दुस-या दिवशीच तालुकास्थळावरील संबंधीत वरीष्ठ अधिकारी उपोषणस्थळी दाखल झाले.उपोषणकर्ते विलास चर्जन यांना टोपलीच्या सहाय्याने विहिरीत उतरुन मसजिवण्याचा प्रयत्न केला.मात्र उपोषणकर्त्याने अतिक्रमण काढल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भुमीका घेऊन सततधार पावसातही विहिरीत उपोषण सुरुच ठेवल्याने प्रशासन नमले व शनिवारी अतिक्रमण काढण्याची कारवाई करुन रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले. त्यानंतर उपोषणकर्ते विलास चर्जन यांना विहिरीतुन बाहेर काढण्यात आल्यावर त्यांनी आपली वयोवृध्द आईच्या हाताने लिंबुरस पिऊन उपोषण सोडले.
सोनोरी ग्रामपंचायत हद्दीत अतिक्रमणाचा मुद्दा नेहमीच वादग्रस्त विषय राहिला आहे.सार्वजनिक रस्त्यावरचे अतिक्रमण असो की घरकुलाचे अवैध बांधकाम हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे.अशातच सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी अनैक तक्रारी व उपोषण केले.याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने जाणीव पुर्वक दुर्लक्ष केल्याने विलास चर्जन यांनी यापुर्वीही दोनदा उपोषण केले. यालाही दाद मिळत नसल्याने त्यांनी ११ सप्टेंबर पासून सार्वजनिक विहिरीत उपोषण सुरु केले. एवढेच नाही तर याची वेळेत दखल घेतली नाही तर विहितच आत्मदहन करण्याचा इशारा दिला. उपोषणाचा पाचवा दिवस सुरु झाला या दरम्यान सततधार पाऊस सुरु झाला तरी विलास उपाशीपोटी विहिरीतच पडुन होते. या प्रकाराने प्रशासन हादरले. महसुल,पोलीस,पंचायत समीती,ग्रामपंचायत प्रशासनाच्या अधिकार्‍यांची बैठक होऊन त्यात दि.१६ रोजी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेण्यात आला.यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त,जेसीबी,महावितरणचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत ग्राम पंचायत मासीक सभा ठराव क्र.८ दि.२५ ऑगस्ट २०२३ नुसार सार्वजनिक रस्त्यावर असलेले अतिक्रमण निष्क्रीय करण्यात आले.
यावेळी नायब तहसिलदार राजेश चौधरी,गटविकास अधिकारी मोहन ऋंगारे,ब्रा.थडीचे ठाणेदार उल्हास राठोड,ग्रा.पं.सचिव दिनेश चोरपगार,विस्तार अधिकारी प्रविण वानखडे,पोलीस पाटील सुधिर गणोरकर,ग्रा.पं.सदस्य सुचिता गणोरकर,शिल्पा बनाईत,अनिता कासदेकर,ज्योती तायडे,आदींची उपस्थिती होती.विशेष म्हणजे उपसरपंचांनी सदर प्रकरण निस्तारण्यात आपली जबाबदारी पार पाडली असली तरी सरपंच या प्रकरणात सुरवाती पासून शेवट पर्यंत कोठेही उपस्थीत नसल्याचे सांगण्यात आले. या अतिक्रमणाला सरपंचाचेच पाठबळ असल्याचा आरोप उपोषणकर्ते विलास चर्जन यांनी यापुर्वीही बोलून दाखविला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top