तत्काळ सुनावणीची मागणी धुडकावली

नवी दिल्ली-
दक्षिणेतून सुरू झालेला सनातन धर्माबाबत वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असून, या संदर्भातील एका याचिकेवर तत्काळ सुनावणीची मागणी न्यायालनाने धुडकावून लावली. यावर २२ सप्टेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे. व्यवसायाने वकील असलेले जी. बालाजी यांनी एका याचिकेतून २ सप्टेंबर रोजी आयोजित सनातन धर्म उर्न्मुलन संमेलनात राज्य सरकारमधील मंत्र्यांची उपस्थिती न्यायसंगत नव्हती.
राज्यघटनेतील कलम २५ आणि २६ चे उल्लंघन असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे तामिळनाडू सरकारला मंत्री उदयनिधी स्टॅलिन आणि सनातन धर्म उर्न्मुलन संमेलनाच्या आयोजकांविरोधात एफआयआर नोंदविण्यासाठी तत्काळ सुनावणीची मागणी केली होती. परंतु, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्यायासनाने याचिका धुकावून लावली. याशिवाय संबंधित याचिकेत सदर प्रकरणात श्रीलंकेतील तामिळ लिट्टे निधीचा काही समावेश आहे, ही बाब सुद्धा सीबीआयकडून तपासण्यात यावी, या मागणीसह तामिळनाडू आणि केरळ राज्यातील पोलिस महासंचालकांविरोधात न्यायालयाची अवमानना केल्याबद्दल कार्यवाही सुरू करण्याचीही मागणी केली आहे.