भरधाव अर्टिगा २०० फूट दरीत कोसळली
चौघांचा जागीच अंत

अमरावती –
चिखलदरा – धामणगाव गढी – परतवाडा मार्गावरच्या मडकी गावाजवळील २०० फूट दरीत कार कोसळून झालेल्या भीषण अपघात ४ जणांचा मृत्यू तर ४ जखमी झाले आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. माहितीनुसार, आर्टिका कारमध्ये आदीलाबाद येथील आठ व्यक्ती पर्यटनासाठी चिखलदर्यात आले होते. त्यापैकी चालक शेख सलमान शेख चांद (वय २८), शिवा कृष्णा अदांकी (वय ३०) , वैभव लक्ष्मणा गुल्ली (वय २९), वनापारधी कोटेश्वरअश्या चार लोकांचा घटनास्थळीच मृत्यू झालेला आहे. तर जी शामलिंगा रेड्डी (वय ३०),के सुमन काटीका (वय २९) , के योगेश यादव (वय ३०), हरीश मुथिनेनी (वय २७)असे चार प्रवासी जखमी झाले आहे. त्यांना दवाखान्यात हलविण्यात आले आहे. सध्या चिखलदारा पोलिस घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास सुरु आहे. या अपघातात अर्टिगा वाहन क्रमांक एपी २८ डीडब्ल्यू २११९ या गाडीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. मृतकांची व जखमींची नावे समोर आलेली नाही. बचाव पथक दरीत उतरले आहे.